मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बंगालमध्ये २६/११ हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट? अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करणाऱ्याला मुंबईतून अटक

बंगालमध्ये २६/११ हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट? अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करणाऱ्याला मुंबईतून अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 23, 2024 12:31 PM IST

abhishek banerjee home recce : कोलकाता पोलिसांनी (Kolkata Police) सांगितले की, आरोपी राजाराम रेगे याने मुंबईहून येऊन कोलकाता येथे राहिल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या पोलिसांनी मुंबईच्या दादर आरोपी रेगेला अटक केली आहे.

बंगालमध्ये २६/११ हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट? अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करणाऱ्याला मुंबईतून अटक
बंगालमध्ये २६/११ हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट? अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करणाऱ्याला मुंबईतून अटक

abhishek banerjee home recce news : बंगालमधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या घराजवळ आणि कार्यालयाची हेरगिरी केल्याप्रकरणी मुंबईतील दादर येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि डिटेक्टिव्ह विभागाने ही कारवाई केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजाराम रेगे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

snake eggs in ulwe : नवी मुंबईतील उलवे इथं बांधकामाच्या ठिकाणी सापडली सापाची ८१ अंडी, सर्पमित्रानं काय केलं पाहा!

डायमंड हार्बर येथील तृणमूलचे खासदार व त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा नंबर घेतल्यानंतर त्यांना फोन देखील करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. कोलकाताच्या वरिष्ठ पोलिसांनी  दावा केला की राजाराम हा दहशतवादी असून त्याने  यापूर्वी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी असलेला डेव्हिड हेडली यासह  काही दहशतवाद्यांची भेट घेतली होती. रेगे हा २६/११च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची योजना आखत होता असे देखील तपसात उघड झाले आहे.

दरम्यान, कोलकाता पोलिसांनी राजारामला अटक करण्याच्या एक दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी त्यांची आणि त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्या हत्तेचा कट रचला जात असल्याची भीती व्यक्त केली होती.

Military Choppers Collide in Malaysia : मलेशियात दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० ठार; व्हिडिओ व्हायरल

या बाबत माहिती देतांना कोलकाता पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, आम्ही मुंबईतून राजाराम रेगे या व्यक्तीला अटक केली असून त्याला कोलकात्यात आणले आहे. रेगे याने टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी रेकी केली. ऐवढेच नाही तर बॅनर्जी आणि त्यांच्या पीए यांचे फोन नंबर घेतले व त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मुंबईत परतण्यापूर्वी रेगे हा कोलकात्याच्या शेक्सपियर सरनी परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हेगारी कट रचण्याचा आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

khed shivapur accident : खेड शिवापूर टोलनाक्याजवळ दारूचा टँकर उलटला! पुणे सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई हल्ल्यापूर्वी राजारामने भेट घेतली होती हेडलीची भेट

कोलकाता पोलिसांचे अतिरिक्त सीपी मुरलीधर शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की कोलकाता पोलिसांनी टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी केल्या प्रकरणी राजाराम रेगेला मुंबईतून अटक केली आहे. रेगे याने २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मास्टर माइंड डेव्हिड हेडलीची भेट घेतली होती. दहशतवादी हेडली मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील फिर्यादी साक्षीदार असून त्याने शिकागो न्यायालयात दिलेल्या जबाबात म्हटले होते की, त्याने मध्य मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात जाऊन राजा राम रेगे यांची भेट घेतली होती. राजाराम हा कोलकातामध्ये आला होता. त्याने अभिषेक बॅनर्जी व त्याच्या पीएचा नंबर घेतला होता. रेगे हा २६/११ सारख्या हल्ल्याची योजना आखत होता. आरोपींनी अभिषेक बॅनर्जी याच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता. तर त्याने कोलकाता येथे आणखी काही लोकांची देखील भेट घेतल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

ममता बॅनर्जी यांनी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. भाजप त्यांना आणि त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांना लक्ष्य करत असून ते दोघेही सुरक्षित नसल्याचा आरोप त्यांनी रविवारी केला होता. ऐवढेच नाही तर त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता.

IPL_Entry_Point