Military Choppers Collide in Malaysia : मलेशियात दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० ठार; व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Military Choppers Collide in Malaysia : मलेशियात दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० ठार; व्हिडिओ व्हायरल

Military Choppers Collide in Malaysia : मलेशियात दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० ठार; व्हिडिओ व्हायरल

Updated Apr 23, 2024 11:50 AM IST

Military Choppers Collide Mid-Air In Malaysia: मलेशिया येथे नौदलाच्या संचलन सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान, हवेत दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या घटनेत १० नागरिक ठार झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

मलेशियात दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० ठार; व्हिडिओ व्हायरल
मलेशियात दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० ठार; व्हिडिओ व्हायरल

Military Choppers Collide Mid-Air In Malaysia: मलेशिया येथे नौदलाच्या संचलन सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान, हवेत दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या घटनेत १० नागरिक ठार झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ९.३२ वाजता घडली असून या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये १० क्रू मेंबर्स होते, असे नौदलाने सांगितले. मृतांची ओळख पटवण्यासाठी सर्व मृतदेह हे लुमुट आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याचे मलेशीयन नौदलाने सांगितले.

 मलेशिया येथे नौदलदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त नौदलाच्या जवानांचे संचलन सोहळा होणार होता व यात लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या हवाई कसरतीदेखील सादर केल्या जाणार होत्या. या सोहळ्याची पुर्वतयारी मलेशियातील मुमूट शहराजवळ असलेल्या नौदलाच्या तळावर सुरू सुरू होती. या  हवाई कसरतींच्या प्रात्यक्षिकाची तयारी करत असतांना दोन लष्करी हेलिकॉप्टर हवेत धडकले. या वेळी काही नागरिक देखील हा पुर्व तयारी सोहळा पाहत होते. दरम्यान, हेलिकॉप्टर हवेत धडकल्याने खाली कोसळले. ही संपूर्ण घटना व्हिडिओत  कैद झाली आहे. या घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या १० अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक मीडिया आउटलेट्सने म्हटले आहे की या घटनेत दोन्ही हेलिकॉप्टरमधील जवान ठार झाले आहेत. या अपघाताचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यात एका हेलिकॉप्टरने दुस-याच्या हेलिकॉप्टरच्या रोटरला धडक दिल्याचे दिसत आहे. यामुले हे दोन्ही हेलिकॉप्टर क्रॅश झाले. यातील एक हेलिकॉप्टर धावत्या ट्रॅकवर कोसळले तर दुसरे जवळच्या स्विमिंग पूलमध्ये कोसळले.

Pune wagholi : तुला पिक्चर दाखवतो टॉयलेटमध्ये चल म्हणत १० वर्षांच्या मुलावर शाळेत लैंगिक अत्याचार

पेराक अग्निशमन आणि बचाव विभागाने दिलेल्या माहितीनुसार "पेराकमधील मंजुंग येथील लुमुट रॉयल मलेशियन नेव्ही स्टेडियममध्ये हेलिकॉप्टरच्या अपघाताची सकाळी माहिती ही सकाळी ९.५०ला मिळाली. यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी तातडीने हेलिकॉप्टरला लागलेल्या आग तातडीने विझवली. यानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले.

रॉयल मलेशियाच्या नौदलानेही एक निवेदन जारी केले जेथे असून त्यांनी या अपघाताची माहिती दिली आहे. मलेशियाच्या नौदलाच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी रंगीत तालीम सरू होती. या दरम्यान हा अपघात झाला. घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्यात अली असून सर्वांचे मृतदेह हे लुमुट रॉयल मलेशियन नेव्ही बेस मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले," असे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, नौदलाने या अपघाताची चौकशी करण्यासाठी चौकशी चौकशी समिती स्थापन केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर