मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Drugs Case: मोठी बातमी ! कुख्यात ड्रग्स तस्कर ललित पाटलाच्या मुसक्या आवळल्या; बंगलोर येथून अटक

Pune Drugs Case: मोठी बातमी ! कुख्यात ड्रग्स तस्कर ललित पाटलाच्या मुसक्या आवळल्या; बंगलोर येथून अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 18, 2023 07:44 AM IST

drugs mafia Lalit Patil arrested in Bangalore : ससुन रुगाणल्यातून फरार झालेल्या ललित पाटीलच्या मुसक्या मुंबई आणि पुणे पोलिसांनी आवळल्या आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुंगारा देण्याऱ्या ललित पाटीलला बंगलोर येथून आज पहाटे अटक करण्यात आली.

drugs mafia Lalit Patil arrested in Bangalore
drugs mafia Lalit Patil arrested in Bangalore

पुणे: पुण्यातील ससुन रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तसेच मोठ्या ड्रग्स तस्करीचे जाळे पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. ललित पाटील हा बंगलोर येथे लपून असल्याची माहिती मुंबई आणि पुणे पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला आज सापळा रचून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ललित पाटील याच्या अटकेमुळे आता अनेक प्रकरणे पुढे येण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

SA vs NED: टी-२० नंतर आता वनडे विश्वचषकातही पछाडले, नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेवर ३८ धावांनी विजय

ससुन रुग्णालयात असतांना ड्रग माफिया ललित पाटीलला हा तेथून ड्रग्स तस्करीचे रॅकेट चालवत होता. ससुन रुग्णालयापुढे मोठे ड्रग्स सापडल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. यानंतर ललित पाटील हा ससुन रुग्णालयातून फरार झाला होता. गेल्या १५ दिवसांपासूंन मुंबई, पुणे आणि नाशिक पोलिस ललित पाटील याच्या मागावर होते. मात्र, ललित पाटील हा पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, ललित पाटील याच्या नाशिकच्या कारखान्यावर छापा टाकून कोटीवधीचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिस ललीलत पाटील याचा शोध घेत होते.

Israel-Hamas War : इस्रायलची मोठी कारवाई.. हमासचा टॉप कमांडर ठार, Video आला समोर

पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा शोध घेण्यासाठी १० पथकांची स्थापना केली होती. महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील पोलिस ललित पाटीलाचा शोध घेत होते. दरम्यान ललित पाटील हा बंगलोर येथे लपून बसला असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांचे एक पथक बंगलोर येथे ललित पाटील याच्या मागावर होते. काल रात्री १२.३० वाजता च्या सुमारास अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईत येथे आणले जाणार आहे. मुंबई पोलिसांनी जंग - जंग पछाडून ललित पाटील १५ दिवसानंतर अटक केली आहे.

 

ललित २ ऑक्टोबरल रात्री ससूनमधून पळून गेला होता. साकीनाका पोलिसांनी नाशिक येथे मोठी कारवाई केली होते. ललित पाटील पुण्यातून, गुजरात, त्यानंतर कर्नाटकला गेला. कर्नाटकातून तो गुजरातला गेला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून ललित पाटीलची माहिती माहिती मिळाली. आज ललित पाटीलला आज मुंबईला आणण्याची शक्यता आहे.

अशी केली अटक 

पुण्यातील ससुन रुग्णालयापुढे मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केल्यावर ललित पाटील २ ऑक्टोबरला रुग्णालयातून फरार झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांचे साकीनाका पोलिस हे देखील या प्रकरणाचा तपास करत होते. त्यांच्या पथकाने नाशिक येथे मोठी कारवाई केल्यावर ते ललित पाटील यांचा शोध घेत होते. या साठी त्यांनी तीन पथके तयार केली होती.  दरम्यान,  पुणे पोलीस त्याचा शोध घेत असताना साकीनाका पोलिसांनी गोपनीयता बाळगत ललित पाटीलच्या शोधासाठी पथके पाठवली होती. दरम्यान दाखल असलेल्या एका प्रकरणात अटक असलेल्या  आरोपीला ललित पाटीलने  नव्या दूरध्वनी  वरून फोन केला. याची माहिती मिळताच साकीनाका पोलीस अलर्ट झाले. ललित हा  एका ट्रॅव्हल कंपनीच्या कारने त्याच्या दोन साथीदारांसह  गुजरात, धुळे आणि कर्नाटक असा प्रवास करत  बंगळूरला आला. या प्रवासात ललित पाटील हा  अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. अखेर एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असल्याची माहिती  साकीनाका पोलिसांना मिळाली. काल रात्री हे पथक बंगळुरू येथे पोहचले. त्यांनी  सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

 

IPL_Entry_Point

विभाग