
World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकातील १५व्या सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा ३८ धावांनी पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात प्रत्येकी सात-सात षटके कमी करण्यात आली. अशा परिस्थितीत ४३ षटकांच्या सामन्यात नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावून २४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ४२.५ षटकांत केवळ २०७ धावापर्यंत मजल मारता आली.
नेदरलँडने दिलेल्या लक्ष्याचा २४५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. दक्षिण आफ्रिकेची ३६ धावांवर पहिली विकेट पडली. क्विंटन डी कॉक २० धावा करून बाद झाला. यानंतर मार्कराम देखील स्वस्तात बाद झाला. क्लासेन आणि मिलर यांनी पाचव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. मात्र, काही षटकानंतर क्लासेनही बाद झाला. यानंतर सर्व जबाबदारी मिलेरच्या खांद्यावर पडली. परंतु, तोही ४३ धावा करून माघारी परतला. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पराभव जवळपास निश्चित झाला. मिलर बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघाने ठराविक अंतराने विकेट गमावली. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ३८ धावांनी गमावला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या नेदरलँडच्या संघाची सुरुवात खराब झाली. नेदरलँडने अवघ्या ८२ धावांवर ५ विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर कर्णधार एडवर्ड्सने खालच्या फळीतील फलंदाजांसोबत चांगली भागीदारी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. एडवर्ड्सने नाबाद ७८ धावा केल्या. व्हॅन डर मर्वेने २९ आणि आर्यन दत्तने ९ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट घेतल्या. तर, जेराल्ड कोएत्झी आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ'डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार, विकेटकिपर), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन .
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.
संबंधित बातम्या
