
इस्रायल आणि हमास युद्धाच्या दरम्यान इस्रायलने हल्ले तीव्र केले असून हमासला संपवण्याचा त्यांनी विडा उचलल्याचे दिसत आहे. मंगळवारी इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इशारा दिला होता की, युद्ध आम्ही सुरू केले नव्हते मात्र आता आम्ही मागे हटणार नाही. दरम्यान इस्रायली डिफेंस फोर्सने ट्वीट करून माहिती दिली आहे की, हमासचा आणखी एक प्रमुख कमांडर अयमान नोफाल याला ठार करण्यात आले आहे. नोफाल गाझामध्ये हमासच्या सेंट्रल ब्रिगेडचा कमांडर होता व याआधी त्याने मिलिट्री इंटेलिजन्सचे प्रमुख पद सांभाळले आहे. नोफाल याचा इस्रायलमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यात हात होता.हमासचा एक प्रमुख नेता असल्याने तो अनेक अपहरणाच्या षडयंत्रात सामील होता. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, ते हमासला संपवल्याशिवाय शांत बसणार नाहीत.
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू होऊन ११ दिवस झाले असून या दरम्यान चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे,तर लाखो लोक जखमी झाले आहेत. इस्रायलने हमासच्या सेंट्रल ब्रिगेडचा कमांडर अयमान नोफाल याला ठार केल्यानं हमासचं मोठं नुकसान झालं आहे.
या हल्ल्याचा व्हिडिओ इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) जारी केला आहे. आयडीएफने ट्विट करत म्हटलं आहे की. “आम्ही हमासच्या माजी प्रमुख आयमन नोफाल याला ठार केलं. नोफल हा गाझामधील हमासच्या सेंट्रल ब्रिगेडचा कमांडर आणि लष्करी गुप्तचर विभागाचा माजी प्रमुख होता. नोफालने इस्त्रायली नागरिकांवर अनेक हल्ले केले होते. तो दहशतवादी संघटनेतील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होता. गिलाड शालितच्या अपहरणाच्या प्लॅनिंगमध्ये अयमान नोफलचा सहभाग होता.
संबंधित बातम्या
