BJP MLA Sunil kamble : रुग्णालयात विविध विकास कामानिमित्त होणाऱ्या उद्घाटन कोनशिलावर नाव नसल्याच्या रागातून भाजप आमदार सुनील कांबळें यांनी शुक्रवारी पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. आमदार सुनील कांबळे यांच्यावर टीकेची झोड देखील उठली होती. हे मारहाण प्रकरण त्यांना आता भोवण्याची चिन्हे आहे. काल रात्री उशिरा सुनील कांबळे यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीया करीता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आला आहे. या वॉर्डचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयात विविध विकास कामानिमित्त होणाऱ्या उद्घाटन कोनशिलेवर भाजप आमदार सुनील कांबळे यांचे नाव नसल्याने आमदार कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली होती. तसेच कार्यक्रमाला माझे नाव का नाही टाकले यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांनाही त्यांनी मारहाण केली होती. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कांबळे हे मंचावरून रागाच्या भरात खाली आले. यावेळी पोलिस कर्मचारी शिवाजी सरक यांच्या कानशिलात कांबळे यांनी लगावली. दरम्यान, सुनील कांबळे यांनी जितेंद्र सातव यांना देखील मारहाण केली.
सोशल मीडियावर झालेल्या व्हिडीओने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. विरोधकांनी देखील भाजप आणि सरकार विरोधात टिप्पणी केली होती. अखेर रात्री या मारहाण प्रकरणी आता कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मी मारले नाही मी फक्त ढकललं अशी प्रतिक्रिया आमदार सुनील कांबळे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल बोलतांना दिली. सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता झालेला नव्हता, गोळ्या घ्यायच्या असल्याने घाईगडबडीत बाहेर पडलो. त्यातून धक्का लागला. मी कोणालाच मारहाण करण्याचा संबंधच नाही. तो कोण व्यक्ती आहे, मी त्याला ओळखत नाही, मी त्याला का मारू ? असे देखील कांबळे म्हणाले.
संबंधित बातम्या