Maharashtra weather update : राज्यात थंडीत चढ उतार पाहायला मिळत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसंपासून राज्यातील तापमानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानात घट तर काही ठिकाणी वाढ झाली आहे. दरम्यान, राज्यात पुढील ४८ तासात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात हा पाऊस होणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. काही राज्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
राज्यात सध्या आद्रता भरपूर येत आहेत. त्यामुळे तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. कमी दाबाची रेषा लक्षद्वीप पासून उत्तर कोकणापर्यंत जात आहे तसेच उत्तरेकडून येणाऱ्या पश्चिमेकडून येणाऱ्या विक्षोभामुळे वायव्य दिशेकडून येणारे थंड वारे राज्यांमध्ये येत आहेत. बंगालच्या उपसागरामधून आग्नेय दिशेकडून येणारे वारे यांची परस्पर क्रिया म्हणजे विंड इंटरॅक्शन उत्तर मध्य महाराष्ट्र व नगरच्या भागावर होत आहे. त्यामुळे कोकण गोव्यात ६ ते ८ तारखेपर्यंत तुरळ ठिकाणी हलक्या ते अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
९ तारखेनंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात ६ ते ९ तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ९ तारखेनंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठ वाडा व विदर्भामध्ये पुढे मराठवाड्यात पुढील ६ ते ९ तारखेपर्यंत तर विदर्भामध्ये पुढील ४८ तासात अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर मात्र मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटसहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ७२ तासात राज्यांमध्ये हलके धुके देखील पडण्याची शक्यता आहे.
पुणे व आसपासच्या परिसरात पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सहा तारखेच्या संध्याकाळ नंतर ९ तारखेपर्यंत भुरभुर पाऊस व अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण कमी होणार आहे. नंतर कमाल व किमान तापमानात घट झाल्यामुळे दिवसभर थंडी जाणवणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.