(6 / 6)आदित्य-L1 मिशन स्पेसक्राफ्ट पाच वर्षांसाठी काम करणार आहे. या काळात यानावरील पेलोड कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, स्पेस वेदर डायनॅमिक्स आदींचा अभ्यास करतील. आदित्य-L1 हा अवकाशात सौर वेधशाळा स्थापन करण्याचा भारताचा पहिला प्रयत्न आहे. मुळात आदित्यला पृथ्वीपासून ८०० किमी उंचीवर ठेवण्याची योजना होती. पण नंतर एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आणि आता, आदित्यला Lagrangian पॉईंट L1 जवळ ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. म्हणूनच, या मिशनला आदित्य-L1 असे नाव देण्यात आले. (ISRO)