Pushkar Jog Sai Lokur Friendship End: ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे अनेक कलाकार प्रेक्षकांच्या घरात लोकप्रिय झाले. अशाच कलाकारांपैकी अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री सई लोकूर याची जोडी होती. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच पर्वात अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री सई लोकूर हे कलाकार देखील सहभागी झाले होते. या शोमध्ये त्यांच्यातील मैत्री खूप गाजली होती. सई लोकूर, पुष्कर जोग आणि मेघा धाडे यांच्यातील मैत्रीने सगळ्यांचेच मनोरंजन केले होते. या पर्वात त्यांची मैत्री खूप गाजली होती. मात्र, आता त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे.
‘बिग बॉस मराठी १’मध्ये पुष्कर जोग याची एक वेगळी बाजू पाहायला मिळत होती. या दरम्यान सई आणि पुष्कर यांच्या मैत्रीची चर्चा सगळीकडे सुरू होती. आजही त्यांच्या मैत्रीची चर्चा होताना दिसते. मात्र, सई आणि पुष्कर यांना त्यांच्या याच नात्यामुळे ट्रोल देखील करण्यात आलं होतं. ‘बिग बॉस’च्या या पर्वावेळी सई अविवाहित होती. तर, पुष्कर मात्र विवाहित होता. त्यामुळे यांच्या नात्यावर अनेक प्रश्न चिन्ह देखील लावण्यात आली होते. मात्र, त्यांनी नेहमीच आपली निखळ मैत्री जपली होती.
मात्र, आता सई लोकूर आणि पुष्कर जोग यांच्या मैत्रीच्या नात्यात दुरावा आल्याचे कळते आहे. ‘बिग बॉस मराठी १’मधून बाहेर पडल्यानंतर सई लोकूर हिने तीर्थदीप रॉय याच्याशी लग्नगाठ बांधली होती. या खेळातून बाहेर पडल्यानंतर सई लोकूर आणि पुष्कर जोग पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत. नुकतीच पुष्कर जोग याने एका वेब पोर्टलला मुलाखत दिली. यात त्याने सई लोकूर हिच्यावरची आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पुष्कर जोगने मीडियाच्या माध्यमातून सई लोकूरला प्रश्न देखील विचारला आहे.
सई लोकूरवर आपली नाराजी व्यक्त करत पुष्कर जोगने तिला प्रश्न विचारला की, ‘सई तू मला लग्नाला बोलावलं नाहीस. तू आई होणार आहेस, ही बातमी कळताच मला खूप आनंद झाला. मी तुला त्यावेळी अभिनंदनाचा मेसेजही केला होता. मात्र, तो मेसेज बघूनही तू रिप्लाय दिला नाहीस. असं का?’ यावेळी पुष्करच्या बोलण्यातून नाराजीचा सूर साफ झळकत होता.
संबंधित बातम्या