मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Christian Oliver: विमानाचा भीषण अपघात; हॉलिवूड अभिनेत्यासह त्याच्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू!

Christian Oliver: विमानाचा भीषण अपघात; हॉलिवूड अभिनेत्यासह त्याच्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू!

Jan 06, 2024 08:50 AM IST

Christian Oliver Death: अभिनेता ऑलिव्हर एका छोट्या खाजगी विमानाने प्रवास करत असताना, हा अपघात घडला आहे. या अपघातात अभिनेत्यासह त्याच्या दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Actor Christian Oliver
Actor Christian Oliver

Christian Oliver Death: जर्मन वंशाचा हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर याचा त्याच्या दोन लहान मुलींसह अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांचे छोटे विमान टेकऑफच्या काही क्षणांतच कॅरेबियन समुद्रात कोसळले, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. ‘द गुड जर्मन’ आणि ‘स्पीड रेसर’ सारख्या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर झळकलेला अभिनेता ऑलिव्हर, गुरुवारी एका छोट्या खाजगी विमानाने प्रवास करत असताना, हा अपघात घडला आहे. या अपघातात अभिनेत्यासह त्याच्या दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

यावेळी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे उपस्थित असलेल्या मच्छीमार आणि तटरक्षकांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून, चारही मृतदेह बाहेर काढले आहेत. या विमानाने प्रवास करत असलेला ५१ वर्षीय अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर, त्याच्या मुली मदिता (१० वर्षे), आणि अॅनिक (१२ वर्षे) यांच्यासह पायलट रॉबर्ट सॅक्स यांचा देखील अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांचे हे विमान ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून गुरुवारी मध्यरात्रीनंतर सेंट लुसियाला जाणार होते.

Malaika Arora Arjun Kapoor Breakup: काय? दोन महिन्यांपूर्वीच झालाय अर्जुन-मलायकाचा ब्रेकअप! पण...

काहीच दिवसांपूर्वी अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर याने इंस्टाग्रामवर समुद्रकिनाऱ्याचा फोटो आणि त्याला हटके कॅप्शन देत आपण कुटुंबासोबत सुट्टीवर असल्याचं म्हटलं होतं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ओलीवहार त्याच्या परिवारासह छानशा ट्रीपवर देखील गेला होता. त्याच्या फोटोंवर प्रेक्षकांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या होत्या. मात्र, अभिनेत्याच्या अपघाती निधनाची बातमी ऐकताच आता सगळ्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेता खिश्चन ऑलिव्हर याने त्याच्या कारकिर्दीत तब्बल ६०हून अधिक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. अभिनेता टॉम क्रूझचा चित्रपट ‘वाल्कीरी’मध्ये देखील ऑलिव्हर झळकला होता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याने टीव्ही मालिका ‘सेव्ह बाय द बेल: द न्यू क्लास’ आणि चित्रपट ‘द बेबी-सिटर्स क्लब’मध्ये साकारलेल्या भूमिका खूप गाजल्या होत्या. ऑलिव्हरने लोकप्रिय जर्मन कॉप शो ‘अलार्म फर कोब्रा ११’च्या दोन सीझन्समध्ये काम केले होते.

WhatsApp channel