मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urvashi Dholakia: हॉस्पिटलच्या बेडवर दिसली टीव्हीची ‘कोमोलिका’; अभिनेत्रीला नेमकं झालं तरी काय?

Urvashi Dholakia: हॉस्पिटलच्या बेडवर दिसली टीव्हीची ‘कोमोलिका’; अभिनेत्रीला नेमकं झालं तरी काय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 06, 2024 07:43 AM IST

Urvashi Dholakia In Hospital: नुकताच उर्वशीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

Urvashi Dholakia In Hospital
Urvashi Dholakia In Hospital

Urvashi Dholakia In Hospital: टीव्ही विश्वाची लाडकी ‘कोमोलिका’ म्हणजेच अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. या फोटोत उर्वशी हॉस्पिटलच्या बेडवर दिसली आहे. उर्वशीचा मुलगा क्षितिज याने हा फोटो हॉस्पिटलमधून पोस्ट केला आहे. अभिनेत्रीच्या मानेमध्ये ट्यूमर झाल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तिच्यावर झालेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. डॉक्टरांनी आता तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. उर्वशीला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यासोबतच उर्वशीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'डिसेंबर २०२३च्या सुरुवातीला मानेमध्ये ट्यूमर आढळल्याने मला शस्त्रक्रिया करावी लागली. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि आता मला १५ ते २० दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.'

AR Rahman Birthday : एआर रहमान मुंबई ऐवजी चेन्नईमध्ये का राहतो? जाणून घ्या कारण

अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिने नुकतेच तिच्या घटस्फोटावर देखील भाष्य केले होते. अनुज सचदेवसोबत घटस्फोटाबद्दल अभिनेत्री मोकळेपणाने बोलली. उर्वशी म्हणाली की, वयाच्या १८व्या वर्षी घटस्फोट घेतल्यानंतर तिला पुन्हा खरे प्रेम मिळाले नाही. वयाच्या १६व्या वर्षी उर्वशीने लग्न केले होते. तर, वयाच्या १७व्या वर्षी तिला जुळी मुले झाली. उर्वशी १८ वर्षांची असताना तिचा घटस्फोट झाला. सिद्धार्थ कननच्या एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले होते की, घटस्फोटानंतर ती इंडस्ट्रीत परतली, तेव्हा लोकांनी तिला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला का? यावर उत्तर देताना ती म्हणाली की, ‘नाही, असं अजिबात झालं नाही. साहजिकच एक आकर्षण होतेच. पण, मी कामावर खूप केंद्रित होते. जेव्हा मला वाटायचे की समोरच्याचा काही चुकीचा हेतू आहे, तेव्हा मी त्याला तिथेच थांबवत असे. मी अगदी स्पष्ट होते.’

उर्वशी ढोलकियाने 'कसौटी जिंदगी की' या मालिकेमध्ये कोमोलिकाची भूमिका केली होती. या मालिकेमुळे ती घराघरात प्रसिद्ध झाली होती. या शिवाय उर्वशी 'बिग बॉस ६'ची विजेती देखील ठरली होती. 'कहीं तो होगा', 'बडी दूर से आए हैं', 'चंद्रकांता', 'नागिन ६' या मालिकांमध्ये देखील ती झळकली आहे.

WhatsApp channel

विभाग