मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Malaika Arjun Breakup: काय? दोन महिन्यांपूर्वीच झालाय अर्जुन-मलायकाचा ब्रेकअप! पण...

Malaika Arjun Breakup: काय? दोन महिन्यांपूर्वीच झालाय अर्जुन-मलायकाचा ब्रेकअप! पण...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 06, 2024 08:15 AM IST

Malaika Arora Arjun Kapoor Breakup: गेल्या काही काळापासून मलायका आणि अर्जुन दोघे वेगळे झाल्याच्या बातम्यांना सोशल मीडियावर चांगलीच हवा मिळत आहे.

Malaika Arora Arjun Kapoor Breakup
Malaika Arora Arjun Kapoor Breakup

Malaika Arora Arjun Kapoor Breakup: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे बी-टाऊनमधील क्युट कपलपैकी एक आहेत. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून दोघे वेगळे झाल्याच्या बातम्यांना सोशल मीडियावर चांगलीच हवा मिळत आहे. या चर्चांदरम्यान दोघेही एकत्र स्पॉट झाले होते. इतकेच नाही तर, या चर्चांना खोडून काढण्यासाठी दोघेही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करतात आणि एकमेकांच्या पोस्ट लाइक करतात. मात्र, आता हे दोघे खरच एकत्र आहेत की, नाही असा प्रश्न चाहत्यांनाही पडला होता.

‘झूम’च्या रिपोर्टनुसार, मलायका आणि अर्जुनचे यांचे ब्रेकअप दोन महिन्यांपूर्वीच झाले होते. मात्र, दोघांनीही आपलं नातं पूर्णपणे तोडलं नसल्याचंही म्हटलं जात आहे. इतक्या वर्षांचे नाते आणि एकमेकांसोबत घालवलेले क्षण विसरणे दोघांसाठीही सोपे नाही. याच कारणामुळे दोघांनाही त्यांच्या नात्याला पुन्हा थोडा वेळ द्यायचा आहे. दोघांच्या ब्रेकअपचे कारण लग्न असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्री मलायका अरोरा हिला लग्न करायचे आहे आणि अर्जुन त्यासाठी तयार नाही, असे देखील म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि मलायका हे दोघे का वेगळे झाले याचे कारण कळले नाही. कदाचित दोघांनाही एकमेकांपासून काही काळ अंतर ठेवावे, असे वाटत असेल.

Urvashi Dholakia: हॉस्पिटलच्या बेडवर दिसली टीव्हीची ‘कोमोलिका’; अभिनेत्रीला नेमकं झालं तरी काय?

काही दिवसांपूर्वी फराह खानने ‘झलक दिखला जा १३’मध्ये पाहुणी म्हणून आलेल्या मलायकाला विचारले होते की, ती नव्या वर्षात म्हणजे २०२४मध्ये लग्न करणार का? तर, यावर उत्तर देताना मलायका म्हणाली होती की, ‘कुणी असेल तर मी त्याच्याशी नक्कीच लग्न करेन. कुणी मला विचारलं तर हो मी लग्न करेन.’ मलायकाच्या या वक्तव्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

करण जोहरचा टॉक शो ‘कॉफी विथ करण’च्या नव्या एपिसोडमध्ये करण जोहरने अर्जुन कपूर याला जेव्हा त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा त्याने उत्तर देताना म्हंटले होते की, त्याला त्याच्या जोडीदाराच्या अनुपस्थितीत लग्नाबद्दल भाष्य करायचे नाही. जोडीदार सोबत असताना तो याविषयी बोलू शकतो.

WhatsApp channel