मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  AR Rahman Birthday : एआर रहमान मुंबई ऐवजी चेन्नईमध्ये का राहतो? जाणून घ्या कारण

AR Rahman Birthday : एआर रहमान मुंबई ऐवजी चेन्नईमध्ये का राहतो? जाणून घ्या कारण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 05, 2024 07:34 PM IST

Happy Birthday AR Rahman : एआर रहमान हा मायानगरी मुंबई ऐवजी चेन्नईमध्ये राहतो. यामागे नेमके काय कारण आहे? याचा खुलासा स्वत: एआर रहमानने केला आहे.

AR Rahman
AR Rahman

AR Rahman Birthday : आपल्या प्रयोगशील संगीतानं कोट्यवधी कानसेनांच्या हृदयावर राज्य करणारा विश्वविख्यात संगीतकार व गायक एआर रहमान याचा ६ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. सांगितीक कारकिर्दीबरोबरच खासगी आयुष्यामुळंही तो कायम चर्चेत असतो. भारतासाठी ऑस्कर जिंकणाऱ्या या गुणी कलाकाराच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या निर्णयांविषयी आजच्या वाढदिवशी जाणून घेणं औचित्याचं ठरेल.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई या मायानगरीमध्ये चित्रपटसृष्टीमधील अनेक कामे होतात. फिल्मसिटीमध्ये मोठ्या मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण होते. अनेक कलाकार हे मुंबईत शिफ्ट होतात. पण तुम्हाला माहिती आहे का? एआर रहमान आजही चेन्नईमध्ये कुटुंबीयांसोबत राहातो. जेव्हा त्याचे काम असते तेव्हा तो मुंबईत येतो. यामागील कारण स्वत: एआर रहमानने सांगितले होते. त्याने सांगितलेले कारण ऐकून तुम्ही देखील चकीत व्हाल.
वाचा: जेव्हा श्रीदेवीच्या निधनाचा फोन आला तेव्हा काय होती प्रतिक्रिया? जान्हवी कपूरने केला खुलासा

मुलाखतीमध्ये रहमानने आंध्र प्रदेशमधील एका निर्मात्याने दिलेल्या ऑफरचा खुलासा केला. हैदराबादमधील बंजारा हिल्स येथे एक शानदार घर देतो असे निर्माता म्हणाला होता. 'मला आजही लक्षात आहे १९९४मध्ये आंध्रप्रदेशमधील एका बड्या निर्मात्याने मला जर चैन्नईमधून बाहेर पडलास तर हैदराबाद येथे एक अलिशान घर देणार असल्याचे सांगितले. ते ऐकून माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. त्यानंतर मला सुभाष घईने हिंदी शिकण्याचा सल्ला दिला. तेथील लोक तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात आणि त्यामुळे मी ती भाषा शिकावी असा त्यांचा हट्ट होता. मात्र, त्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्ड माफियांचा दबदबा होता. त्यामुळे मी याचा विचारही केला नाही' असे रहमान म्हणाला.

एआर रहमानचा जन्म ६ जानेवारी १९६६ साली चेन्नईमध्ये झाला. त्याचे खरे नाव दिलीप कुमार असे होते. रेहमान यांना संगीताचा वारसा वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील आर.के.शेखर हे तमिळ आणि मल्याळम चित्रपटांना संगीत द्यायचे. पण रेहमान नऊ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घर चालवण्यासाठी रेहमान वाद्ये भाड्याने देऊ लागला. काही दिवसांनी त्यांच्या आईने हा व्यवसाय सांभाळला आणि रेहमान यांना कामाचे स्वातंत्र्य दिले. रेहमानच्या पत्नीचे नाव सायरा बानो असे आहे. तर रेहमानचे मूळ नाव दिलीप कुमार. त्यांच्या नावाबाबत योगायोग म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नीचे नावही सायरा बानो आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग