Arbaaz Khan Unfollows Malaika Arora: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याने नुकतीच शूरा खान हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. आता अरबाज शूरासोबत हनिमूनसाठी गेला आहे. मात्र, सध्या मीडियाचे लक्ष अरबाज खानच्या वैयक्तिक आयुष्याकडे लागले आहे. अरबाज खान याने दुसरे लग्न करून सगळ्यांनाच चकित केले होते. आता अरबाजने शूरा खानसोबत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. मात्र, दुसऱ्या लग्नानंतर आता अरबाजच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अरबाज खानने एक्स-पत्नी मलायका अरोरा हिला सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे. आता त्याने मलायका अरोरापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसऱ्यांदा संसार थाटल्यानंतर आता अरबाज खान याने मलायकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये आता अंतर निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अरबाजच्या लग्नात देखील मलायका गायब होती. आता शूरासोबत लग्न केल्यानंतर अरबाजने आता त्याची एक्स-पत्नी मलायका अरोरा हिला सोशल मीडियावरून अनफॉलो केल्याचे बोलले जात आहे.
अरबाज खान इंस्टाग्रामवर काही मोजक्याच लोकांना फॉलो करतो. त्याच्या यादीत केवळ १२७ जणांचा समावेश आहे. मात्र, त्याच्या या यादीत मलायका अरोराचे नाव नाही. याचाच अर्थ तो मलायकाला फॉलो करत नाही. मात्र, मलायकाच्या इन्स्टाग्राम फॉलोविंगच्या यादीत अरबाजचे नाव दिसत आहे. याचाच अर्थ मलायका तिच्या माजी पतीला इन्स्टाग्रामवर फॉलो करते. मात्र, अरबाजने आता तिला फॉलो करणे बंद केले आहे. आता ही बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. घटस्फोटानंतरही एकमेकांसोबत दिसणाऱ्या या जोडीने सोशल मीडियावर हे पाऊल उचलल्याचे पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
याआधीही जेव्हा अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाला होता, तेव्हा त्याने अभिनेत्रीला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले होते. मात्र, नंतर २०१७मध्ये त्याने पुन्हा एकदा तिला फॉलो केले होते. आता अरबाजच्या या कृतीमुळे मलायका अरोराला नक्कीच वाईट वाटू शकते. मात्र, अरबाजने असे अचानक का केले असा प्रश्नही चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे.