मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Blake Lively Bedroom: हॉलिवूड अभिनेत्रीच्या आलिशान बेडरूमची झलक पाहिलीत का? सोशल मीडियावर शेअर केला फोटो!

Blake Lively Bedroom: हॉलिवूड अभिनेत्रीच्या आलिशान बेडरूमची झलक पाहिलीत का? सोशल मीडियावर शेअर केला फोटो!

Jan 03, 2024 10:38 PM IST

Blake Lively Luxurious Bedroom: हॉलिवूड अभिनेत्रीने तिचा स्वतःचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्या आलिशान बेडरूमची झलक दाखवली आहे.

Blake Lively Luxurious Bedroom
Blake Lively Luxurious Bedroom

Blake Lively Luxurious Bedroom:हॉलिवूड अभिनेत्री ब्लेक लाइव्हली हिने तिच्या आलिशान बेडरूमचा फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. मॅनहॅटनमधील या आलिशान घरात अभिनेत्री ब्लेक लाइव्हली तिचा पती-अभिनेता रायन रेनॉल्ड्स आणि आपल्या कुटुंबासोबत राहते. हॉलिवूड अभिनेत्रीने तिचा स्वतःचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्या आलिशान बेडरूमची झलक दाखवली आहे.

अभिनेत्री ब्लेक लाइव्हली गतवर्षी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क शहरात पार पडलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये मायकल कॉर्स फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने गोल्डन शिमरी आउटफिट परिधान केला होता. याच आउटफिटचा फोटो शेअर करताना तिने आपल्या बेडरूममध्ये उभे राहून किलर पोज दिली आहे. यामध्ये तिचं बेडरूम देखील दिसत आहे. यासोबतच तिच्या हॉल वेची झलक देखील पाहायला मिळत आहे. अभिनेत्री ब्लेक लाइव्हली हिचं घर अतिशय आलिशान आहे. ब्लेकच्या मागे बाथरूम दिसत असून, त्यात एक मोठा बाथ टब दिसत आहे. त्याच्या बाजूला एक लांबलचक हॉलवे बाहेरच्या बाजूला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ब्लेक लाइव्हली आणि रायन रेनॉल्ड्स यांचं हे घर ब्राऊन थीममध्ये दिसत आहे. घराची डिझाईन न्यूड वूडन बीमने करण्यात आली आहे. तिच्या घरात सगळीकडे रस्टिक इंटेरियर दिसत आहे. या घरात अभिनेत्री ब्लेक लाइव्हली आणि अभिनेता रायन रेनॉल्ड्स त्यांच्या चार मुलांसह जेम्स, इनेज, बेट्टी आणि त्यांच्या नऊ महिन्यांच्या बाळासह राहत आहेत. ब्लेक लाइव्हली आणि रायन रेनॉल्ड्स यांनी आपल्या नऊ महिन्याच्या बाळाचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही.

हॉलिवूडच्या या जोडीकडे मॅनहॅटन अपार्टमेंट आणि पाउंड रिज,न्यू यॉर्क येथे मोठी मालमत्ता आहे, जी या जोडप्याने २०१२मध्ये ५ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केली होती. २०२३ला निरोप देताना इतरांप्रमाणेच,ब्लेकने देखील गतवर्षीच्या तिच्या आवडत्या आठवणी इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत.

WhatsApp channel