मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtracha Favourite Kon: यंदा कोण ठरणार ‘महाराष्ट्राचा फेवरेट’? प्रेक्षकांना देता येणार आपला कौल!

Maharashtracha Favourite Kon: यंदा कोण ठरणार ‘महाराष्ट्राचा फेवरेट’? प्रेक्षकांना देता येणार आपला कौल!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 06, 2024 09:27 AM IST

Maharashtracha Favourite Kon Nomination: दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात येणार आहेत.

Maharashtracha Favourite Kon 2023 Nominations
Maharashtracha Favourite Kon 2023 Nominations

Maharashtracha Favourite Kon Nomination: नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागत असतात. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच यंदाच्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्कार सोहळ्याची यंदाची नामांकन यादी जाहीर झाली आहे. ‘झी टॉकीज’ वाहिनीवर हा दिमाखदार पुरस्कार सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे.

मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयाचा आणि कलेचा कस लावून रसिक मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी कलाकारही वाट पाहत असतात. त्यांच्या कलेला दाद देणारा आणि रसिकमनाची पावती देणारा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा पुरस्कार रसिकांच्या पसंतीतून निवडला जातो. नुकतीच या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली. या जाहीर झालेल्या नावांमधून रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या मतानंतर ‘महाराष्ट्राचा फेवरेट’ ही मानाची ट्रॉफी कलाकारांना दिली जाणार आहे. यासाठी रसिक प्रेक्षक आपले मत नोंदवू शकतात. आपलं मत नोंदवण्यासाठी प्रेक्षक ‘झी५’च्या mfkzeetalkies.zee5.com वेबसाईटवर जाऊन आपल्या आवडत्या कलाकाराला वोट देऊ शकतात.

Christian Oliver: विमानाचा भीषण अपघात; हॉलिवूड अभिनेत्यासह त्याच्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू!

दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट, फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट लोकप्रिय चेहरा, फेवरेट स्टाईल आयकॉन, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका आणि फेवरेट चित्रपट बाह्य गीत या विभागांसाठी नामांकने जाहीर झाली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत यावर्षी ‘वेड’, ‘बाईपण भारी देवा’, ‘सुभेदार’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘वाळवी’, ‘नाळ २’, ‘झिम्मा २’, ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटांच्यानावाचा समावेश आहे.

‘फेवरेट दिग्दर्शक’ या नामांकनामध्ये रितेश देशमुख, केदार शिंदे, दिग्पाल लांजेकर, परेश मोकाशी, सुधाकर रेड्डी यंक्कटी, हेमंत ढोमे, हेमंत अवताडे यांची वर्णी लागली आहे. ‘फेवरेट अभिनेता’ या विभागातील नामांकनासाठी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, रितेश देशमुख, सुबोध भावे, नागराज मंजुळे आणि अजय पुरकर यांची नावे असून, ‘फेवरेट अभिनेत्री’ या विभागाअंतर्गत ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील अभिनेत्रींची टीम, तसेच 'वेड' चित्रपटासाठी जिनिलीया देशमुख, ‘झिम्मा २’ या चित्रपटातील अभिनेत्रींची टीम आणि 'वाळवी' साठी शिवानी सुर्वे यांच्या नावांचा समावेश आहेत.

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर झाल्यानंतर वोटिंग लाईन्स सुरू झाल्या असून, प्रेक्षकांनी आपल्या आवडत्या कलाकारांना वोट देता येणार आहे. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हे ठरवण्यासाठी प्रेक्षक तीन पद्धतीने त्यांचं मत नोंदवू शकतात. आपलं मत नोंदवण्यासाठी ७७९९९४७२३१ ते ३७ या क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमचे मत देऊ शकता. ९९६६०२१९०० या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास थेट व्हॉट्सअपवर तुम्हाला वोटिंग डिटेल्स मिळतील. तसेच, mfkzeetalkies.zee5.com या वेबसाईटवरही वोटिंग सुविधा उपलब्ध आहे.

WhatsApp channel