अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा; शाळांच्या मंजुरीसाठी केला कोट्यवधींचा घोटाळा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा; शाळांच्या मंजुरीसाठी केला कोट्यवधींचा घोटाळा

अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा; शाळांच्या मंजुरीसाठी केला कोट्यवधींचा घोटाळा

Updated May 25, 2022 04:36 PM IST

शिक्षण क्षेत्रात मोठा गैरव्यवहार : शिक्षणाधिका-यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करत बनवले बोगस स्वमान्यतापात्र , शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

<p>अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा</p>
<p>अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा</p>

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध जोग एज्यूकेशन ट्रस्टच्या संचालिका तसेच प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग यांची आई सुरेखा जोग यांच्यासह तीन शिक्षणाधिका-यांवर शिक्षण क्षेत्रातील एका बड्या घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोग एज्युकेशन सोसायटीच्या ११ शाळांसाठी शिक्षणाधिकाऱ्याच्या खोट्या सह्या करून शाळांसाठी बनावट स्व-मान्यता प्रमाणपत्र बनवून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी किसन दतोबा भुजबळ यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग तसेच गौतम शंकर शडगे, किशोर पवार, हेमंत सावळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत जोग एज्यूकेशन ट्रस्टच्या ११ शाळांनी त्यांची खोटी खोटी व बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार केले. असे करून त्यांनी या शाळांवर प्रशासक बसवण्याची कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. यासाठी जोग एज्युकेशन ट्रस्टने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे सादर केली. या अकरा शाळांच्या मुख्याध्यापकाद्वारे २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे प्रतिशुल्क मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात खोटी माहिती सादर केली. यामुळे त्यांनी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी बुडवला आहे. या प्रकरणी जोग एज्यूकेशन ट्रष्ट विरोधात तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या प्रकरणी या समितीने सविस्तर तपास केला. यात या शाळेने ११ शाळांच्या स्व मान्यतेचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे आढळले. यामुळे मंगळवारी रात्री उशीरा या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींना सध्या अटक करण्यात आली नसून बंडगार्डन पोलिस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर