'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता घर सोडून गेली होती. तिच्यावर कार्तिकने केलेल्या आरोपांवर सगळ्यांनी विश्वास ठेवला. सागरने देखील खोटे नाटक केले. पण त्याने मनात मुक्ताला सर्वांसमोर खरे असल्याचे सिद्ध करण्याचे ठरवले होते. पण सागरचे सर्वांसमोरचे वागणे पाहून माधवी आणि पुरुषोत्तम यांना देखील धक्का बसला होता. त्यांनी सागरला सुनावले होते. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सागर मुक्ताला घरी घेऊन येताना होते. तो संपूर्ण घरात साजावट करतो. त्यानंतर मुक्ताच्या येण्याची जोरदार तयारी केली. ती पाहून स्वाती आणि इंद्राला धक्का बसतो. जर मुक्ता या घरात राहणार असेल तर मी या घरात राहू शकत नाही असे स्वाती सर्वांसमोर सांगते. ते ऐकून मुक्ता स्वत:च त्या घरातून बाहेर जाणार असल्याचे सांगते.
वाचा: पोझ देत असताना जोरात वारा आला अन्...; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान
कार्तिकचा फोन सागर घेऊन जातो. तो त्याच्या खोलीमध्ये जाऊन नवा फोन मागवला आहे असे सांगतो. कार्तिक त्यावर याची गरज नव्हती असे बोलतो. त्यानंतर तो अचानक लाईट जाते. त्यानंतर सगळे बाहेर येतात. तेवढ्यात सागर मुक्ताला घेऊन घरी येतो. ते पाहून कार्तिक गडबडीत घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतो. पण सागर त्याला थांबवतो आणि एक पिक्चर बघून जा असे सांगतो.
वाचा: ट्रेंडमध्ये असलेले 'गुलाबी साडी' हे गाणे कोणी गायले आणि कसे सुचले माहिती आहे का? जाणून घ्या
सागर आरतीला विश्वासात घेऊन प्लान आखतो. या सगळ्यात ते दोघे कार्तिककडून सत्य वदवून घेतात. सागर या सगळ्या गोष्टींचा व्हिडीओ करतो. घरातल्या टीव्हीवर तो इंद्रा, स्वाती, लकी, मुक्ता यांच्यासमोर तो दाखवतो. आरतीला देखील तेथे बोलावून घेतो. आरती सगळ्यांसमोर घडलेला प्रकार सांगते. कार्तिकने तिला कसे फसवले याविषयी देखील सांगते. त्यानंतर कार्तिकला पोलिसांच्या ताब्यात देतात.
वाचा: थिएटरमधील चित्रपटात आता जाहिरातींचा अडथळा नाही! पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय; काय आहे कारण?
एवढं झाल्यानंतर ही मुक्ता घरातून निघून जाते. कारण स्वाती आणि इंद्रा यांना कार्तिक निर्दोषी असल्याचे वाटत असते. शेवटी इंद्रा आणि स्वाती हे गोखलेंच्या घरी जातात. इंद्रा माधवीची माफी मागते तर स्वाती मुक्ताची. ते मुक्ताला परत घरी घेऊन येतात.
संबंधित बातम्या