'प्रेमाची गोष्ट' मालिकेत कार्तिक या खलनायकाची एण्ट्री झाल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. प्रत्येक वेळी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्तिकने मुक्तावर अतिप्रसंग केला. मुक्ता सर्वांना ओरडून ओरडून सत्य सागंण्याचा प्रयत्न करते. पण कोळी कुटुंबीय तिच्यावर जराही विश्वास ठेवत नाहीत. उलट कार्तिकच्या बाजूनेच उभे राहतात. आता सागर सर्वांसमोर कार्तिकचा खरा चेहरा आणणार आहे.
सावनी सईची कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यासाठी ती एक डाव देखील आखते. पण हा सगळा डाव तिच्यावर उलटतो. सईची कस्टडी मिळताच सावनी साखरपुडा करणार असते. पण कस्टडी न मिळाल्यामुळे हर्षवर्धन साखरपुड्यास नकार देतो. सई घरी आली नाही म्हणून आदित्य सागरला फोन करतो आणि काही प्रश्न विचारतो. तुमची दुसरी बायको आपल्या घरात कोणालाच आवडत नाही तरी तुम्ही सईला तिच्यासोबत का पाठवता? पप्पा तुमचे खरच तिच्यावर प्रेम नाही ना? असे आदित्य विचारतो. सागर त्याच्या या प्रश्नांची उत्तरे देण्याची टाळाटाळ करतो.
वाचा: गौरव मोरे करतोय बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सोबत रोमॅन्स, मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मुक्ताला तीन महिन्यांसाठी दिल्लीला जायचे असते. तसेच घडलेला प्रकार विसरता यावा म्हणून मुक्ता दिल्लीला जाण्यास तयार होते. सागर तिच्यासोबत सईला देखील घेऊन जाण्याची परवानगी देतो. मुक्ता तयारी करत असताना सागर येतो आणि तिला विचारतो झाली का तुमची तयारी? जाणे इतके महत्त्वाचे नसेल तर नका जाऊ असे देखील तो म्हणतो. पण आता मुक्ता काही ऐकयला तयार नाही.
वाचा: 'मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर...', निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा
मुक्ता सईला सोबत घेऊन जाण्याची तयारी करत असते. तिचे कपडे आणण्यासाठी ती कोळींच्या घरी जाते. पण इंद्रा मात्र तिला पाहून चिडते. ती सावनी आमचे घर तोडायला बसली होती आणि आता तू पण अशीच वागतेय. जा तू इथून निघून असे ती बोलताना दिसत आहे.
वाचा: ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सुपरहिट सिनेमातून पदार्पण करणाऱ्या वरुण धवन याच्याकडे एकूण किती संपत्ती?
सागर हुशारीने कार्तिकचा फोन काढून घेतो. त्या फोनमधून आरतीला भेटण्यासाठी बोलावते. आरती तो मेसेज पाहाते आणि कार्तिक आणखी काही वाईट करु नये यासाठी त्याला भेटण्यासाठी जाते. तेव्हा कार्तिक ऐवजी सागर तेथे असतो. सागर तिला पोलिसांची भीती दाखवतो. तेव्हा आरती त्याला कार्तिक हा अतिशय वाईट माणूस असल्याचे सांगून सत्य आहे हे देखील स्पष्ट करते. आता मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.