मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘डर्टी पिक्चर’नंतर विद्या बालन दिवसाला फुकायची ‘इतक्या’ सिगरेट! व्यसनाविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली...

‘डर्टी पिक्चर’नंतर विद्या बालन दिवसाला फुकायची ‘इतक्या’ सिगरेट! व्यसनाविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 26, 2024 09:53 AM IST

अभिनेत्री विद्या बालन हिने खुलासा केला आहे की, एका चित्रपटात एक पात्र साकारल्यानंतर तिला धूम्रपानाचे प्रचंड व्यसन लागले होते.

‘डर्टी पिक्चर’नंतर विद्या बालन दिवसाला फुकायची ‘इतक्या’ सिगरेट! व्यसनाविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली...
‘डर्टी पिक्चर’नंतर विद्या बालन दिवसाला फुकायची ‘इतक्या’ सिगरेट! व्यसनाविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली...

विद्या बालन ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्याने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांच्या हृदयात तिने हक्काचे स्थान निर्माण केले आहे, यात शंकाच नाही. चाहते तिच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच विद्याचा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील विद्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. या सगळ्या दरम्यान, अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, एका चित्रपटात एक पात्र साकारल्यानंतर तिला धूम्रपानाचे प्रचंड व्यसन लागले होते.

ट्रेंडिंग न्यूज

विद्या बालन हिने तिच्या 'द डर्टी पिक्चर'मध्ये धुम्रपान केले होते. अलीकडेच, यूट्यूब टॉक शो, अनफिल्टर्ड विथ समदीश या संभाषणात विद्या बालनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी ती म्हणाली की, ‘चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी मी धूम्रपान केले. मला धुम्रपान कसे करायचे हे माहित होते. परंतु, मी प्रत्यक्षात धूम्रपान करत नव्हते. पण त्या पत्राची गरज म्हणून सतत सिगरेट हातात घ्यावी लागायची. एक पात्र म्हणून, आपण अशा गोष्टी बनावटपणे करू शकत नाही. मला सुरुवातीला संकोच वाटला. कारण, सिगारेट ओढणाऱ्या स्त्रियांबद्दल एक विशिष्ट समज आहे. आता ते कमी झाले असले तरी पूर्वी ते जास्त होते.’

जुई गडकरी अन् ईशा केसकरच्या मालिकेने घेतली झेप; तेजश्री प्रधान राहिली मागे! पाहा या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट

दिवसातून २-३ सिगारेट ओढण्याचे व्यसन लागले!

जेव्हा विद्याला विचारण्यात आले की, ती अजूनही धूम्रपान करते का, तेव्हा तिने कबूल केले की, ती आता धूम्रपान करत नाही. यावेळी विद्या म्हणाली की, ‘नाही, मला असं वाटत नाही की, मी कॅमेरावर हे सांगावं. पण, मला स्मोकिंग करायला आवडते. जर, तुम्ही मला सिगारेटचे कोणतेही नुकसान नाही, असे सांगितले असते, तर मी धूम्रपान करणारी बनले असते. मला धुराचा वास आवडतो. अगदी माझ्या कॉलेजच्या दिवसांतही मी धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या शेजारी बसायचे, त्यामुळे मला दिवसातून २-३ सिगारेट ओढण्याचे व्यसन लागले होते.’

'दो और दो प्यार'ला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद

विद्या बालनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री 'दो और दो प्यार' या चित्रपटाद्वारे दीर्घ काळानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि इलियाना डिक्रूझ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'दो और दो प्यार'ला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या फार पसंतीस उतरू शकला नाही. रिलीज होऊन सात दिवस उलटले, तरी विद्या बालनचा 'दो और दो प्यार' हा चित्रपट ५ कोटींची कमाई करू शकलेला नाही.

IPL_Entry_Point

विभाग