Vidya Balan On Nepotism: अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या 'दो और दो प्यार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रतीक गांधीही दिसणार आहे. अभिनेत्रीही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, विद्याही तिच्या संघर्षाबद्दल अनेक खुलासे करत आहे. आता विद्याने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर अर्थात नेपोटीझमवर प्रतिक्रिया दिली आहे. गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीत आलेल्या आणि स्वत:चे नाव कमावणाऱ्या कलाकारांच्या यादीत विद्या बालनचा समावेश आहे.