बारामती लोकसभा मतदारसंघ राज्यात प्रतिष्ठेचा बनला आहे. आम्हाला शरद पवार यांना पराभूत करायचं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी खुलेआम आव्हान दिलं असून शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही अजित पवार यांच्याविरोधात शड्डू ठाकले आहे. यामुळे बारामती लोकसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेयांचे तिकीट निश्चित झाले आहे तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे येण्याची शक्यता होती. या जागेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र आता शिवसेना नेते विजय शिवतारे देखील बारामतीतून लढण्यास इच्छुक असून यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता असताना त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला द्यावा तसेच वेळ पडली तर मी भाजपच्या चिन्हावरही निवडणूक लढण्यास तयार असल्याचं शिवतारेंनी जाहीर केल्यानं बारामतीत मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून आपल्या समर्थकांसह महायुतीत सामील झाल्यापासून भाजपच्या बारामती विजयाच्या स्वप्नांना धुमारे फुटले आहेत. अजित पवारांच्या बंडखोरीने बारामतीलोकसभा मतदारसंघाचं गणितही बदललं आहे. सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणारेअजित पवार यांनी यंदा त्याच्याविरोधातथेट पत्नीला मैदानात उतरवण्याचे प्रयत्न सुरूकेले आहेत. मात्र अजित पवारांचे पारंपरिक राजकीय विरोधक विजय शिवतारे यांनीही बंड पुकारलं आहे.अजित पवारांविषयी जनतेच्या मनात रोषआहे. ते कोणत्याही स्थितीत बारामतीतून निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे पवार विरोधी मते मिळवण्यासाठी मलातिकीट दिलं जावं, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
एका न्यूज चॅनलशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले अजित पवार यांच्या पत्नीला उमदेवारी दिल्यास महायुतीची एक जागा धोक्यात येऊ शकते. येथे अजित पवार यांची पत्नी कोणत्याही परिस्थिती जिंकू शकत नाही. बारामतीत पवारांविषयी लोकांमध्ये रोष आहे.
यासाठी मी निवडणूक लढवत आहे. मी आता माघार घेणार नाही. मला काही काळ पक्षापासून दूर व्हावं लागलं तरी चालेल, मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवायला तयार आहे. ही जागा शिवसेनेकडे घ्यावी आणि मला तिकीट द्यावं, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच मला तर भाजपच्याही चिन्हावर लढायला हरकत नाही, अशी शिवतारे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
संबंधित बातम्या