चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी कर्णधार एमएस धोनीने आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. अशा परिस्थितीत हा सीझन त्याचा शेवटचा आयपीएल सीझन असेल, असा विश्वास चाहत्यांना आहे. मात्र, भविष्यातही तो आयपीएल खेळताना दिसेल, असा विश्वास भारताच्या दोन माजी खेळाडूंना आहे.
आयपीएल २०२३ हा एमएस धोनीचा शेवटचा हंगाम मानला जात होता. मात्र, चाहत्यांचे प्रेम पाहून त्याने १७वा सीझनही खेळण्याची घोषणा केली होती. या सीझनमध्ये तो आपल्या फटकेबाजीने चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे. एमएस धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्ध सलग ३ षटकार मारून आपली जुनी शैली चाहत्यांना दाखवली.
जिओ सिनेमावर बोलताना सुरेश रैना आणि वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांनी सांगितले की, त्यांना विश्वास आहे की एमएस धोनी आणखी एक किंवा दोन सीझन खेळेल. वास्तविक, जिओ सिनेमावर धोनीच्या आयपीएल भविष्याची चर्चा सुरू होती. यादरम्यान अँकरने रैना आणि आरपी सिंगला विचारले की धोनीचा हा शेवटचा आयपीएल सीझन आहे का?
यावर आरपी सिंह म्हणाला, ‘हा त्याचा शेवटचा सीझन असेल असे वाटत नाही. तसेच, सुरेश रैना म्हणाला की, हो खेळणार. यावर आरपी सिंह याने पुन्हा उत्तर दिले की, तुम्ही एका सीझनबद्दल बोलाल तर तो दोन सीझन खेळून जाईल’.
संबंधित बातम्या