पोटऱ्यांमध्ये वेदना होत असतानाही धोनीने केली तुफानी खेळी, थालाचा तो फोटो पाहून चाहते हळहळले
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  पोटऱ्यांमध्ये वेदना होत असतानाही धोनीने केली तुफानी खेळी, थालाचा तो फोटो पाहून चाहते हळहळले

पोटऱ्यांमध्ये वेदना होत असतानाही धोनीने केली तुफानी खेळी, थालाचा तो फोटो पाहून चाहते हळहळले

Apr 01, 2024 06:03 PM IST

ms dhoni ipl 2024 batting highlights : एम एस धोनी ८व्या क्रमांकावर फलंदाजी आला. धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच चाहत्यांनी तुफान जल्लोष केला. यानंतर धोनीनेही स्फोटक खेळी करत चाहत्यांची मने जिंकली. पण धोनी आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.

पोटऱ्यांमध्ये वेदना होत असूनही धोनीने खेळली तुफानी खेळी, थलाचा तो फोटो पाहून चाहते हळहळले
पोटऱ्यांमध्ये वेदना होत असूनही धोनीने खेळली तुफानी खेळी, थलाचा तो फोटो पाहून चाहते हळहळले (AP)

आयपीएल २०२४ च्या १३व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा २० धावांनी पराभव केला. दिल्लीचा हा यंदाचा पहिला विजय ठरला. विशाखापट्टणम हे दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राऊंड आहे. या मैदानावर दिल्ली दोन सामने खेळणार आहे. पण विशाखापट्टणमच्या वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियममध्ये दिल्लीच्या निळ्या जर्सीपेक्षा पिवळ्या रंगाची जर्सी घातलेले जास्त प्रेक्षक दिसत होते.

एमएस धोनीला पाहण्यासाठी आलेले हे सर्व प्रेक्षक होते. तसेच, ते धोनी फलंदाजीला केव्हा येतो, याची आतुरतेने वाट पाहत होते, या सामन्यात चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली.

एम एस धोनी ८व्या क्रमांकावर फलंदाजी आला. धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच चाहत्यांनी तुफान जल्लोष केला. यानंतर धोनीनेही स्फोटक खेळी करत चाहत्यांची मने जिंकली. पण धोनी आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.

दरम्यान, या सामन्यानंतर माहीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यावरून धोनी अजूनही पूर्णपणे फिट नसल्याचे दिसून येत आहे.

या सामन्यानंतर, धोनी एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सीएसकेसाठी ही स्फोटक खेळी खेळल्यानंतर वेदनांनी ओरडताना दिसत होता. व्हायरल व्हिडीओमध्ये थला आपल्या पायांना आईस पॅक लावलेला दिसत आहे. यादरम्यान त्याने ग्राउंड्समनसोबत फोटो काढले आणि युवा खेळाडूंना टिप्स दिल्या. धोनी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे फोटोवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, तो फलंदाजी करताना असे काही दिसत नव्हते.

धोनीने १६ चेंडूत ३७ धावा केल्या

दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सीएसकेने १७१ धावांपर्यंत मजल मारली. सीएसकेकडून एमएस धोनीने १६ चेंडूत ३७ धावा केल्या. धोनीने २३० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.

विशेष म्हणजे, IPL २०२४ मध्ये धोनी पहिल्यांदाच फलंदाजीसाठी आला होता आणि त्याने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. चाहते माहीच्या फलंदाजीची वाट पाहत होते. शेवटच्या दोन षटकात जेव्हा सीएसकेला विजयासाठी ४६ धावांची गरज होती. तेव्हा धोनी आणि जडेजा मैदानात होते, त्यांनी सीएसकेच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

एनरिक नॉर्खियाच्या शेवटच्या षटकात धोनीने पहिल्या चेंडूवर चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर दमदार षटकार ठोकला. यानंतर धोनीने चौथ्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. या षटकात एकूण २० धावा केल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या