बिहारचा युवा क्रिकेटपटू वैभव सुर्यवंशी याने इतिहास रचला आहे. वैभवने वनडे सामन्यात त्रिशतक ठोकले आहे. वनडेत त्रिशतक करणारा वैभव सुर्यवंशी पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
वास्तविक, बिहार क्रिकेट असोसिएशनने रविवारी (३१ मार्च) रणधीर शर्मा अंडर १९ वनडे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील एका सामना वैभव सुर्यवंशीने एकट्याने ३०० हून अधिक धावांचा पाऊस पाडला.
यापूर्वी, २००२ काउंटी प्रथम श्रेणी एकदिवसीय सामन्यात सरे संघासाठी अली ब्राउनने ग्लॅमॉर्गन संघाविरुद्ध २६८ धावांची विक्रमी खेळी खेळली होती.
तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड भारताच्या रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने वनडेमध्ये सर्वाधिक २६४ धावा केल्या होत्या.
दरम्यान, आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा वैभव सुर्यवंशी हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
विशेष म्हणजे, वनडेत त्रिशतक झळकावण्याची कामगिरी यापूर्वी अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत झाली आहे. १४ जून २०२२ रोजी ऑस्ट्रेलियाच्या स्टीफन नीरोने ब्रिस्बेनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावून इतिहास रचला होता. निरोने दृष्टिहीन खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेत १४० चेंडूत ३०९ धावांची नाबाद खेळी खेळली होती
तर, वैभव सूर्यवंशीने रविवारी १७८ चेंडूंत नाबाद ३३२ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याच्या योगदानामुळे समस्तीपूरने सहरसा संघाचा २८१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
संबंधित बातम्या