MI vs RR Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, मुंबईच्या या फलंदाजाला करा कर्णधार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs RR Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, मुंबईच्या या फलंदाजाला करा कर्णधार

MI vs RR Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, मुंबईच्या या फलंदाजाला करा कर्णधार

Updated Apr 01, 2024 01:25 PM IST

MI vs RR Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ चा चौदावा सामना राजस्थान आणि मुंबई यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येतील.

MI vs RR Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, मुंबईच्या या फलंदाजाला करा कर्णधार
MI vs RR Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, मुंबईच्या या फलंदाजाला करा कर्णधार

MI vs RR Playing 11 Prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज (१ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आज सायंकाळी ७:३० वाजेपासून मुंबई वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबईने आतापर्यंत खेळेलेले दोन्ही गमावले आहेत. तर राजस्थानने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत.

अशा स्थितीत चांगल्या लयीत असलेल्या राजस्थानचा सामना करणे मुंबई इंडियन्ससाठी मोठे आव्हान असेल. तसेच कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिक पंड्या पहिल्यांदाच होम ग्राऊंडवर म्हणजेच मुंबईत प्रेक्षकांचा सामना करणार आहे. याआधीच्या दोन स्टेडियममध्ये पंड्याला खूपच ट्रोल करण्यात आले. आता मुंबईच्या वानखेडेवर काय होते ते पाहावे लागेल.

दरम्यान, मुंबई असो की राजस्थान , दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match taam prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल. पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

यष्टिरक्षक कोण?

यष्टिरक्षक म्हणून तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये जोस बटलर, संजू सॅमसन आणि इशान किशन यांना स्थान देऊ शकता. आयपीएलमध्ये जोस बटलरची चांगलीच बोलते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याचवेळी संजू सॅमसनही चांगल्या लयीत दिसत आहे. तर इशान किशन मुंबईसाठी ओपन करेल आणि लक्षात ठेवा हे मैदान वानखेडेचे आहे, अशा स्थितीत ईशान मोठी इनिंग खेळू शकतो.

या फलंदाजांवर विश्वास दाखवा

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा हे तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये फलंदाज म्हणून सर्वोत्तम पर्याय असतील. रोहित शर्माला वानखेडेचे मैदान खूपच लकी आहे. यशस्वी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून तो वानखेडेच्या खेळपट्टीवर चांगलाच कहर करू शकतो.

ऑलराऊंडर कोण असेल?

अष्टपैलू खेळाडू म्हणून तुम्ही हार्दिक पांड्या, आर अश्विन आणि रियान पराग यापैकी कोणालाही वगळू शकत नाही. हार्दिक पंड्याला वानखेडेचे मैदान चांगलेच माहीत आहे. त्याचवेळी रियान पराग आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये अप्रतिम फॉर्ममध्ये दिसला आहे. अश्विनही तुम्हाला चांगले गुण देऊ शकतो.

गोलंदाजीत बुमराह-चहल सर्वोत्तम पर्याय 

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल हे सर्वोत्तम पर्याय असतील. बुमराह आणि चहल हे दोघेही विकेट घेण्यासाठी ओळखले जातात. बुमराह वानखेडेवर धारदार गोलंदाजी करू शकतो, तर चहलही शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतो आहे.

मुंबई वि. राजस्थान ड्रीम इलेव्हन टीम

यष्टिरक्षक - संजू सॅमसन, इशान किशन, जोस बटलर (उपकर्णधार)

फलंदाज - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा

अष्टपैलू - हार्दिक पांड्या, आर अश्विन, रियान पराग

गोलंदाज- जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल

Whats_app_banner

संबंधित बातम्या