आयपीएल २०२४ च्या १४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान विजयी रथावर स्वार आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी दाखवली आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सची कामगिरी मात्र, अतिशय निराशाजनक झाली आहे. नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IPL २०२४ चा १४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात १ एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.
मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्सवर लाइव्ह टेलिकास्ट केला जाईल. तर, जिओ सिनेमावर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग केले जाईल.
मुंबई इंडियन्स आयपीएल २०२४ मध्ये अद्याप पहिल्या विजयाच्या शोधात आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. मुंबईच्या गोलंदाजांविरुद्ध हैदराबादच्या फलंदाजांनी २७७ धावा ठोकल्या होत्या.
मात्र, मुंबईच्या फलंदाजांची कामगिरी दमदार होती. २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ २४६ धावा करण्यात यशस्वी ठरला होता.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.