जावयासाठी सासरा मैदानात, शाहीनचं कर्णधारपद बाबरला दिल्याने शाहीद आफ्रिदी संतापला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  जावयासाठी सासरा मैदानात, शाहीनचं कर्णधारपद बाबरला दिल्याने शाहीद आफ्रिदी संतापला

जावयासाठी सासरा मैदानात, शाहीनचं कर्णधारपद बाबरला दिल्याने शाहीद आफ्रिदी संतापला

Mar 31, 2024 07:59 PM IST

Shahid Afridi on Babar Azam Captaincy : वनडे वर्ल्डकप २०२३ मधल्या पाकिस्तानी संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बाबरकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. बाबरच्या जागी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला कर्णधार बनवण्यात आले, पण तरीही संघाच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

जावयासाठी सासरा मैदानात, शाहीनचं कर्णधारपद बाबरला दिल्याने शाहीद आफ्रिदी संतापला
जावयासाठी सासरा मैदानात, शाहीनचं कर्णधारपद बाबरला दिल्याने शाहीद आफ्रिदी संतापला

पाकिस्तान क्रिकेट सध्या चर्चेत आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदी बाबर आझमची निवड केली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान टी-20 संघाच्या कर्णधारपदी शाहीन आफ्रिदीची निवड करण्यात आली होती.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी निवड समितीच्या शिफारशीनंतर बाबरला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. शान मसूदचे कसोटी संघाचे कर्णधारपद कायम असेल.

विशेष म्हणजे, वनडे वर्ल्डकप २०२३ मधल्या पाकिस्तानी संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बाबरकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. बाबरच्या जागी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला कर्णधार बनवण्यात आले, पण तरीही संघाच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

बाबर आझमला पुन्हा कर्णधार बनवताच पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद शफ्रिदी भडकला आहे. शाहीद आफ्रिदा हा शाहीन आफ्रिदीचा सासरादेखील आहे. शाहिदने एका ट्विटमध्ये संघाच्या कर्णधारपदाबाबत आपले मत व्यक्त केले, यावरून बाबर आझमला कर्णधारपद मिळाल्याने तो खूश नसल्याचे दिसून येत आहे.

GT Vs SRH Highlights : मिलरने षटकार मारून सामना संपवला, हैदराबादचा शेवटच्या षटकात पराभव

वास्तविक, शाहिद आफ्रिदीने ट्विट करून लिहिले की, निवड समितीमध्ये असलेल्या अत्यंत अनुभवी क्रिकेटपटूंच्या निर्णयाने मी आश्चर्यचकित झालो आहे. मला अजूनही विश्वास आहे की जर बदल आवश्यक होता तर रिझवान हा सर्वोत्तम पर्याय होता! पण आता निर्णय घेण्यात आल्याने मी टीम पाकिस्तान आणि बाबर आझमला माझा पूर्ण पाठिंबा आणि शुभेच्छा देतो".

वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची वाईट कामगिरी

वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये पाकिस्तानी संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. पाकिस्तानने ९ पैकी फक्त ४ सामने जिंकले होते आणि गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर होते. खुद्द बाबरलादेखील फलंदाजीत फारशी कमाल दाखवता आली नव्हती. यानंतर अनेक दिग्गज आणि चाहत्यांनी संघावर आणि बाबर वर जोरदार टीका केली होती. अशा स्थितीत बाबरने १५ नोव्हेंबर २०२३ रोजी पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या