मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : धोनी नंबर वन… IPL मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू, रोहित शर्माचा विक्रम मोडला

MS Dhoni : धोनी नंबर वन… IPL मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू, रोहित शर्माचा विक्रम मोडला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 01, 2024 06:02 PM IST

Ms Dhoni IPL Record : धोनी आयपीएलच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक वेळा २० किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. २००८ मध्ये आयपीएल पदार्पण करणाऱ्या ४२ वर्षीय धोनीने रविवारी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २५३ वा सामना खेळला.

MS Dhoni धोनी नंबर वन… IPL मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू, रोहित शर्माचा विक्रम मोडला
MS Dhoni धोनी नंबर वन… IPL मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू, रोहित शर्माचा विक्रम मोडला

आयपीएल २०२४ च्या १३व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा २० धावांनी पराभव केला. दिल्लीचा हा यंदाचा पहिला विजय ठरला. विशाखापट्टणम हे दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राऊंड आहे. या मैदानावर दिल्ली दोन सामने खेळणार आहे. पण विशाखापट्टणमच्या वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियममध्ये दिल्लीच्या निळ्या जर्सीपेक्षा पिवळ्या रंगाची जर्सी घातलेले जास्त प्रेक्षक दिसत होते.

ट्रेंडिंग न्यूज

एमएस धोनीला पाहण्यासाठी आलेले हे सर्व प्रेक्षक होते. तसेच, ते धोनी फलंदाजीला केव्हा येतो, याची आतुरतेने वाट पाहत होते, या सामन्यात चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली.

एम एस धोनी ८व्या क्रमांकावर फलंदाजी आला. धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच चाहत्यांनी तुफान जल्लोष केला. यानंतर धोनीनेही स्फोटक खेळी करत चाहत्यांची मने जिंकली. पण धोनी आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. पण त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. धोनीने १६ चेंडूत ३७ धावा ठोकल्या. त्याने ३ षटकार आणि ४ चौकार मारले. 

एका षटकात सर्वाधिकवेळा २० धावा करणारा फलंदाज

खरं तर, आता धोनी आयपीएलच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक वेळा २० किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. २००८ मध्ये आयपीएल पदार्पण करणाऱ्या ४२ वर्षीय धोनीने रविवारी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २५३ वा सामना खेळला. त्याने या सामन्याच्या शेवटच्या षटकात एनरिक नॉर्खियाची धुलाई करत २० धावा केल्या. धोनीने नवव्यांदा एका षटकात २० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

धोनीने रोहित शर्माला मागे टाकले

या विक्रमात धोनीने रोहित शर्माला मागे टाकले. रोहित शर्मा एका षटकात २० किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. हिटमॅनने आयपीएलमध्ये ८ वेळा एका षटकात २० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर २४५ IPL सामन्यात ६२८० धावा आहेत.

पंतचाही टॉप-तीन मध्ये समावेश 

ऋषभ पंतचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंतने ६ वेळा आयपीएलमध्ये एका षटकात २० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

IPL_Entry_Point