चेन्नई सुपर किंग्सचा स्फोटक फिनीशर एम एस धोनी रविवारी (१४ एप्रिल) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ चेंडूत २० धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या आणि सीएसकेच्या गोलंदाजांच्या बळावरच चेन्नईने वानखेडे स्टेडिमयवर मुंबई इंडियन्सचा २० धावांनी धुव्वा उडवला.
धोनी पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकात फलंदाजीला आला आणि ४ चेंडूत त्याने हार्दिक पंड्याला लागोपाठ ३ षटकार आणि लगावले. यामुळे CSK ची धावसंख्या २० षटकात २०६ धावांपर्यंत पोहोचली. यानंतर रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी ६३ चेंडूत १०५ धावांची नाबाद खेळी खेळली, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
पहिल्या डावानंतर धोनी ड्रेसिंग रूमच्या दिशेने पायऱ्या चढत असताना त्याला पायऱ्यांवर चेंडू पडलेला दिसला. धोनीने तो चेंडू उचलून प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका मुलीला दिला.
दरम्यान, ४२ वर्षीय धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. असे बोलले जात आहे. धोनीनी आपल्या कारकिर्दीचा शेवट विजेतेपदासह करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच चाहते आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करण्यासोबतच धोनीलाही चिअर करणे पसंत करत आहेत.
सामन्यानंतर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने धोनीच्या सामन्यातील प्रभावाचे कौतुक केले. तो म्हणाला, “आमच्या युवा विकेटकीपरने त्या ३ षटकारांसह आम्हाला खूप मदत केली, या २० धावाच सामन्यात निर्णयाक ठरल्या. या मैदानावर आम्हाला १०-१५ अतिरिक्त धावांची गरज होती. बुमराहने मध्यंतरी चांगली गोलंदाजी केली. मला वाटते की आम्ही गोलंदाजीसह आमची योजना अचूकपणे अंमलात आणली”.