भारतात सध्या आयपीएल २०२४ चा थरार रंगला आहे. या स्पर्धेतील ४६वा सामना रविवारी (२८ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात CSK ने पॅट कमिन्सच्या हैदराबादचा ७८ धावांनी पराभव करत मागील पराभवाचा बदला घेतला.
या विजयासह चेन्नईला टॉप-३ मध्ये पुनरागमन करण्यात यश आले. दरम्यान, या सामन्यातील एक पोस्टर सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. हे पोस्ट एम एस धोनीशी संबंधित आहे.
वास्तविक, धोनीमुळे एका चाहत्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आयपीएलमध्ये धोनीची प्रचंड क्रेझ आहे. तो ज्या मैदानावर खेळायला जातो, तेथे धोनीचे समर्थक सीएसकेची जर्सी घालून त्याला सपोर्ट करण्यासाठी पोहोचतात. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झालेले असतात.
आता असाच एक चाहता रविवारी संध्याकाळी चेपॉक स्टेडियमवर आला होता. त्याच्या हातात एक पोस्टर होते, ज्यावर त्याने आपल्या प्रेयसीसोबत ब्रेकअप केल्याचे लिहिले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने या ब्रेकअपसाठी धोनीला जबाबदार धरले आहे.
चेपॉकवर पोहोचलेल्या या चाहत्याच्या हातात एक पोस्टर होते, त्या पोस्टवर त्याने लिहिले होते, की “मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेक अप केले आहे. कारण तिच्या नावात ७ अक्षरं नव्हती.”
धोनीच्या जर्सीचा क्रमांक ७ आहे. त्याचवेळी त्याचा वाढदिवसही ७ जुलैला येतो. अशा परिस्थितीत तिच्या नावावर ७ अक्षरे नसल्याने चाहत्याने प्रेयसीशी ब्रेक अप केले. या चाहत्याचे हे पोस्टर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टरबाबत इतर यूजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.
हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर सीएसकेसाठी ऋतुराज गायकवाडने ९८ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १८० होता.
डॅरिल मिशेलने ५२ धावांची खेळी खेळली आणि शिवम दुबेने नाबाद ३९ धावा केल्या आणि एमएस धोनीने २ चेंडूंचा सामना करताना नाबाद ५ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संघ १८.५ षटकांत १३४ धावा करत सर्वबाद झाला.