मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Michael Bracewell : न्यूझीलंडचा धोनी... ब्रेसवेल आहे तरी कोण? जो सातव्या क्रमांकावर येऊन शतकं ठोकतोय

Michael Bracewell : न्यूझीलंडचा धोनी... ब्रेसवेल आहे तरी कोण? जो सातव्या क्रमांकावर येऊन शतकं ठोकतोय

Jan 21, 2023, 01:37 PM IST

    • Who Is Michael Bracewell : पहिल्या वनडे भारतीय संघासाठी शुभमन गिलने २०८ धावांची विक्रमी खेळी खेळली. या जोरावर टीम इंडियाने ३४९ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ३३७ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेलने एकट्याने झुंज दिली आणि आणि संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली.
india vs new zeland

Who Is Michael Bracewell : पहिल्या वनडे भारतीय संघासाठी शुभमन गिलने २०८ धावांची विक्रमी खेळी खेळली. या जोरावर टीम इंडियाने ३४९ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ३३७ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेलने एकट्याने झुंज दिली आणि आणि संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली.

    • Who Is Michael Bracewell : पहिल्या वनडे भारतीय संघासाठी शुभमन गिलने २०८ धावांची विक्रमी खेळी खेळली. या जोरावर टीम इंडियाने ३४९ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ३३७ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेलने एकट्याने झुंज दिली आणि आणि संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली.

Who Is Michael Bracewell, ind vs nz odi : सध्या भारत-न्यूझीलंड वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला, हा सामना खूपच रोहमर्षक ठरला. सामन्यात भारताकडून शुभमन गिलने द्विशतक ठोकले तर न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेलने वादळी शतक ठोकले. त्याने अवघ्या ७८ चेंडूत १४० धावा चोपल्या. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार आणि १० षटकार ठोकले. यानंतर मायकल ब्रेसवेलची खूपच चर्चा होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

तिसरे वेगवान शतक ठोकले

ब्रेसवेलने अवघ्या 57 चेंडूत शतक झळकावले. यासह, न्यूझीलंडसाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी कोरी अँडरसनने २०१४ मध्ये विंडीजविरुद्ध ३६ चेंडूत शतक झळकावले होते, तर जेसी रायडरने २०१४ मध्ये विंडीजविरुद्ध ४६ चेंडूत शतक झळकावले होते.

इतकंच नाही तर ब्रेसवेलने ७व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन शतकं झळकावून धोनीच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे.

ब्रेसवेलने मार्च २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले

ब्रेसवेल हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने मार्च २०२२ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. ब्रेसवेलचा दोन महिन्यांनंतर मे २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या न्यूझीलंडच्या कसोटी संघातही समावेश करण्यात आला. तर जुलैमध्ये आयर्लंडविरुद्ध त्याला T20 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. ब्रेसवेलने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी ४ कसोटी, १७ एकदिवसीय आणि १३ टी-20 सामने खेळले आहेत.

हॅट्ट्रिक घेऊन इतिहास रचला

ब्रेसवेलने गेल्या वर्षी त्याच्या T20I कारकिर्दीतील पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. ब्रेसवेल हा T20I क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. एवढेच नाही तर एकही षटक पूर्ण न करता ३ किंवा त्याहून अधिक बळी घेणारा ब्रेसवेल पहिला गोलंदाज ठरला.

घरातील चौथा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला

मायकेल ब्रेसवेलचा जन्म १४ फेब्रुवारी १९९१ रोजी मास्टरटन शहरात झाला. तो माजी कसोटीपटू ब्रेंडन आणि किवी संघाचे माजी खेळाडू जॉन ब्रेसवेल यांचा पुतण्या आहे. त्याचबरोबर तो न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज डग ब्रेसवेलचा चुलत भाऊ आहे. ब्रेसवेलने वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अॅडम गिलख्रिस्टला आपला आदर्श मानणारा मायकेल सुरुवातीला गिलीप्रमाणे विकेटकीपिंग करायचा. तथापि, नंतर त्याने उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी सुरु केली, हाच निर्णय त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला.