मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli On Ronaldo : लोक म्हणत होते तो संपलाय, पण… विराटची रोनाल्डोसाठी अप्रतिम पोस्ट, एकदा बघाच

Virat Kohli On Ronaldo : लोक म्हणत होते तो संपलाय, पण… विराटची रोनाल्डोसाठी अप्रतिम पोस्ट, एकदा बघाच

Jan 21, 2023, 11:26 AM IST

    • virat kohli instagram post on cristiano ronaldo : पीएसजीविरुद्धच्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने दोन गोल करत चाहत्यांना नाचायला भाग पाडले. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जोरदार कौतुक केले आहे.
Virat Kohli On Ronaldo

virat kohli instagram post on cristiano ronaldo : पीएसजीविरुद्धच्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने दोन गोल करत चाहत्यांना नाचायला भाग पाडले. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जोरदार कौतुक केले आहे.

    • virat kohli instagram post on cristiano ronaldo : पीएसजीविरुद्धच्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने दोन गोल करत चाहत्यांना नाचायला भाग पाडले. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जोरदार कौतुक केले आहे.

Virat Kohli On Cristiano Ronaldo : सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे गुरुवारी (१९ जानेवारी) पॅरिस सेंट जर्मेन (PSG) आणि रियाध इलेव्हन यांच्यात एक प्रदर्शनीय सामना खेळला गेला. या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आपल्या खेळाने चाहत्यांना वेड लावले. रियाध इलेव्हनचा कर्णधार असलेल्या रोनाल्डोने सामन्यात २ अप्रतिम गोलदेखील केले.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

मात्र, रोनाल्डोच्या या दमदार कामगिरीनंतरही रियाध इलेव्हनचा पीएसजीविरुद्ध ४-५ अशा फरकाने पराभव झाला. पीएसजीच्या संघात लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे आणि नेमार ज्युनियरसारखे खेळाडू होते.

या सामन्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोचे कौतुक केले आहे. कोहलीने रोनाल्डोच्या टीकाकारांनाही चांगलेच फटकारले आहे.

विराट कोहलीची इन्स्टाग्राम स्टोरी

कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, 'तो अजूनही सर्वोच्च स्तरावर आहे. फुटबॉल पंडित बातम्यांमध्ये राहण्यासाठी त्याच्यावर दर आठवड्याला टीका करतात आणि नंतर सहज शांत होतात. जगातील अव्वल क्लबपैकी एक असलेल्या संघाविरुद्ध त्याने अशी कामगिरी केली आहे. लोक म्हणते होते की, तो संपला आहे".

मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यातील हा शेवटचा सामना होता, असे म्हटले जात आहे. कारण रोनाल्डोने अलीकडेच आशियाई क्लब असलेल्या अल नासर एफसीशी करार केला आहे. तर लिओनेल मेस्सी पीएसजी या फ्रेंच क्लबकडून खेळतो. रोनाल्डोचे वय वाढले आहे, अशा परिस्थितीत तो पुढचा विश्वचषक खेळू शकणार नाही, असे मानले जात आहे.