मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli-Roger Federer: रॉजर फेडरर भारतात येणार, विराट कोहलीच्या मॅसेजला रिप्लाय

Virat Kohli-Roger Federer: रॉजर फेडरर भारतात येणार, विराट कोहलीच्या मॅसेजला रिप्लाय

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 01, 2022 10:46 AM IST

Roger Federer reply to Virat Kohli video message: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी टेनिस सम्राट रॉजर फेडररसाठी एक व्हिडिओ मॅसेज शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने फेडररला जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हटले आहे. त्याचवेळी रॉजर फेडररनेही कोहलीच्या व्हिडीओ मॅसेजला उत्तर देत आभार मानले आहेत.

Virat Kohli-Roger Federer
Virat Kohli-Roger Federer

दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर ने नुकतेच आपल्या टेनिसमधील सुवर्ण कारकीर्दिला अलविदा केला. यानंतर जगाच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. फेडररच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनेही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ने गुरुवारी टेनिस सम्राट रॉजर फेडररसाठी एक व्हिडिओ मॅसेज शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने फेडररला जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हटले आहे. त्याचवेळी रॉजर फेडररनेही कोहलीच्या व्हिडिओ मॅसेजला उत्तर देत आभार मानले आहेत.

विराट कोहलीचा व्हिडीओ मॅसेज

ATP द्वारे पोस्ट केलेल्या अधिकृत व्हिडिओ मॅसेजमध्ये कोहली म्हणाला, “हॅलो रॉजर, तुला तुझ्या अद्भुत कारकिर्दीबद्दल शुभेच्छा देणे, हा माझ्या आयुष्यातील मोठ्या गौरवाचा क्षण आहे. तुझ्यामुळे आम्हाला खूप सुंदर क्षण आणि आठवणी मिळाल्या आहेत.”

सोबतच विराट पुढे म्हणाला, “मला २०१८ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तुला वैयक्तिकरित्या भेटण्याची संधी मिळाली, जी मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. एक गोष्ट जी मला तुला खेळताना बघायला मिळाली ती म्हणजे केवळ टेनिसच्या जगातूनच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक तुला पाठिंबा देतात आणि प्रेम करतात. इतर कोणत्याही क्रीडापटूसाठी अशी एकता मी कधीही पाहिली नाही. ही अशी गोष्ट आहे, जी निर्माण केली जाऊ शकत नाही. जी कोणत्याही प्रकारे निर्माण केली जाऊ शकत नाही".

फेडररचा रिप्लाय

फेडररने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करून कोहलीच्या मॅसेजला उत्तर दिले आहे. फेडररने कोहलीचा हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यासह त्याने कोहलीचे आभार मानले. याशिवाय मी लवकरच भारतात येणार असल्याचेही फेडररने म्हटले आहे. यानंतर या दोन्ही खेळाडूंच्या खेळ भावनेचे जगभरातून कौतुक होत आहे. कोहली आणि फेडरर दोघेही आपापल्या खेळातील महान खेळाडूंपैकी एक मानले जातात.

<p>Roger Federer instagram story</p>
Roger Federer instagram story
WhatsApp channel

संबंधित बातम्या