मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Roger Federer Farewell: असं फेअरवेल सर्वांच्या नशिबी नसतं, फेडररनं नदाल-जोकोसह क्रिडा विश्वाला रडवलं

Roger Federer Farewell: असं फेअरवेल सर्वांच्या नशिबी नसतं, फेडररनं नदाल-जोकोसह क्रिडा विश्वाला रडवलं

Sep 24, 2022 12:49 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Roger Federer Farewell-laver cup 2022: शुक्रवार (२३ सप्टेंबर) ची रात्र टेनिससाठी खास होती. कारण टेनिसचा सम्राट रॉजर फेडरर करिअरचा शेवटचा सामना खेळण्यासाठी कोर्टवर उतरणार होता. स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररला कारकिर्दीतील शेवटचा सामना जिंकता आला नाही. ४१ वर्षीय फेडररने हा सामना दुहेरीत खेळला. यामध्ये त्याचा जोडीदार स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल होता. नदाल आणि फेडरर यांच्यात जवळपास दोन दशकांपासून कडवी टक्कर होती. मात्र, सामना संपल्यानंतर फेडररसह नदाल आणि टेनिस विश्वातील अनेक दिग्गजांच्या डोळ्यांत अश्रू तरळताना दिसले. असे फेअरवेल खूप कमी खेळाडूंच्या वाटेला आलेले आहे. 

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने नुकतीच निवृत्ती जाहीर केली होती. ४१ वर्षीय फेडररने शुक्रवारी (२३ सप्टेंबर) आपल्या करिअरचा शेवटचा सामना खेळला. फेडररने हा सामना दुहेरीत खेळला. यामध्ये त्याचा जोडीदार स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल होता.
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

लंडनमध्ये झालेल्या या सामन्यात फेडरर-नदाल जोडीला पराभव पत्करावा लागला. अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक या जोडीने त्यांचा ४-६, ७-६(२), ११-९ असा पराभव केला. सामना संपल्यानंतर फेडररने नदालला आणि इतर खेळाडूंना घट्ट मिठी मारली. सामन्यानंतर टेनिस कोर्टवरील वातावरण अतिशय भावनिक झालं होतं. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

सामन्यानंतर रॉजर फेडरर म्हणाला, "सामना छान झाला. राफेलसोबत खेळणे आणि सर्व महान खेळाडूंचे येथे उपस्थित असणे, हे सर्व अविश्वसनीय आहे. याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार." आपल्या पत्नीचे आभार मानताना त्याने टेनिसच्या या प्रवासात तिची साथ खूप महत्त्वाची असल्याचे सांगितले. तिने मला पुढे जाऊ दिले आणि सतत खेळण्याची प्रेरणा दिली. ती मला खूप आधी थांबवू शकली असती पण तिने तसे केले केले नाही .
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

यावेळी रॉजर फेडरर प्रचंड भावूक झाला होता. जेव्हा तो टीम युरोपच्या इतर खेळाडूंना भेटायला जात होता तेव्हा त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. तर त्याचवेळी फेडररच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

यादरम्यान नदालशिवाय सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचही त्याच्यासोबत दिसला. यावेळी जगातील अनेक स्टार उपस्थित होते. फेडररने सर्वांना मिठी मारली मारली आणि टेनिसचा निरोप घेतला.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

राफेल नदाललाही आपले अश्रू रोखता आले नाहीत. रॉजर फेडरर पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत २० ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. तर राफेल नदाल या बाबतीत अव्वल स्थानावर आहे, त्याने सर्वाधिक २२ ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

रॉजर फेडररने २८ जानेवारी २०१८ रोजी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपले शेवटचे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले होते. त्यावेळी विजेतेपदाच्या लढतीत त्याने क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा पराभव केला होता. त्यानंतर २० ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. मात्र, या वर्षाच्या शेवटी राफेल नदालने त्याचा विक्रम मोडला.
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

त्या विजेतेपदानंतर फेडररवर वाढत्या वयाचा प्रभाव स्पष्टपणे दिसू लागला आणि त्यामुळे त्याचा फॉर्मही घसरला. दुखापतीमुळे फेडररला यावर्षी एकाही ग्रँडस्लॅममध्ये भाग घेता आला नाही. फेडररने शेवटच्या वेळी २०२१ फ्रेंच ओपनमध्ये भाग घेतला होता.
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

फेडररने या महिन्यात १५ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया पोस्ट शेअर करून टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी फेडररने लिहिले होते की, 'मी ४१ वर्षांचा आहे. मी २४ वर्षात १५०० हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिसने मला पूर्वीपेक्षा जास्त उदारतेने वागवले आहे. तसेच, करिअरमध्ये कधी थांबायचे हे ओळखता यायला हवे"
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

दिग्गज रॉजर फेडररने त्याच्या कारकिर्दीत २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. ज्यात विम्बल्डन ८, ऑस्ट्रेलियन ओपन सहा, यूएस ओपनमध्ये पाच आणि फ्रेंच ओपनचे एक जेतेपद सामील आहे. फेडररने एकूण १०३ एकेरी विजेतेपद जिंकले आहेत. तसेच, अनेक आठवडे तो एटीपी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. याशिवाय डेव्हिस कप विजेतेपद आणि ऑलिम्पिक पदकही त्याच्या नावावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

दिग्गज रॉजर फेडररने त्याच्या कारकिर्दीत २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. ज्यात विम्बल्डन ८, ऑस्ट्रेलियन ओपन सहा, यूएस ओपनमध्ये पाच आणि फ्रेंच ओपनचे एक जेतेपद सामील आहे. फेडररने एकूण १०३ एकेरी विजेतेपद जिंकले आहेत. तसेच, अनेक आठवडे तो एटीपी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. याशिवाय डेव्हिस कप विजेतेपद आणि ऑलिम्पिक पदकही त्याच्या नावावर आहे.(all photo -AP)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज