मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill : १७ दिवसांत चौथं शतक, रोहित-विराटला जमलं नाही ते गिलनं केलं; एकाच सामन्यात अनेक विक्रम

Shubman Gill : १७ दिवसांत चौथं शतक, रोहित-विराटला जमलं नाही ते गिलनं केलं; एकाच सामन्यात अनेक विक्रम

Feb 02, 2023, 10:37 AM IST

    • Shubman Gill New records : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा २-१ असा पराभव केला आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना अहमदाबाद येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने १६८ धावांच्या फरकाने विजय मिळवला. हा भारताचा T20 मधील सर्वात मोठा विजय आहे.
Shubman Gill

Shubman Gill New records : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा २-१ असा पराभव केला आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना अहमदाबाद येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने १६८ धावांच्या फरकाने विजय मिळवला. हा भारताचा T20 मधील सर्वात मोठा विजय आहे.

    • Shubman Gill New records : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा २-१ असा पराभव केला आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना अहमदाबाद येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने १६८ धावांच्या फरकाने विजय मिळवला. हा भारताचा T20 मधील सर्वात मोठा विजय आहे.

Shubman Gill century vs new zeland: भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. अहमदाबाद टी-२० सामना खेळण्यापूर्वी गिलच्या नावावर अर्धशतकदेखील नव्हते. पण न्यूझीलंडविरुद्धच्या अहमदाबाद टी-20 सामन्यात गिलने झंझावाती शतक ठोकले. हा त्याचा सहावा टी-२० सामना होता.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

गिलने या सामन्यात नाबाद १२६ धावा केल्या. त्याच्या ६३ चेंडूंच्या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार मारले. शुभमनने ५४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तर त्याआधी त्याने ३५ चेंडूत आुपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतरच्या ५० धावा गिलने अवघ्या १९ चेंडूत ठोकल्या.

गिलने कसोटीत ४ आणि एकदिवसीय सामन्यात ४ शतके झळकावली आहेत. आता त्याने टी-20 मध्येही शतक झळकावले आहे. नुकतेच त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत द्विशतक आणि एक शतक झळकावले होते.

गेल्या १७ दिवसांतील चौथे शतक

शुभमनचे गेल्या १७ दिवसांतील हे चौथे आंतरराष्ट्रीय शतक आहे. याआधी शुभमनने वनडे फॉरमॅटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. यात एक द्विशतकही आहे. या वर्षी १५ जानेवारीला शुभमनने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ११६ धावा केल्या होत्या, त्यानंतर १८ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात २०८ धावा केल्या होत्या. २४ जानेवारीला शुभमनने न्यूझीलंडविरुद्ध ११२ धावांची खेळी केली होती. आता त्याने टी-20 मध्ये शतक झळकावले आहे.

टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक वैयक्तिक धावा

इतकंच नाही तर शुभमन गिल टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. या बाबतीत त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व दिग्गज भारतीयांना मागे टाकले आहे. विराट कोहलीने ८ सप्टेंबर २०२२ रोजी अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद १२२ धावांची खेळी खेळली होती.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आतापर्यंत केवळ ७ भारतीय फलंदाजांना शतक झळकावता आले आहे. गिल, कोहली, रोहित यांच्याशिवाय सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि दीपक हुडा हे खेळाडू आहेत.

शुभमन तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा खेळाडू

या शतकानंतर शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत तो पाचवा भारतीय ठरला. शुभमन गिलच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकली आहेत.