मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill : रमीज राजा यांनी केलं शुभमन गिलचं बारसं, दिलं 'हे' खास नाव

Shubman Gill : रमीज राजा यांनी केलं शुभमन गिलचं बारसं, दिलं 'हे' खास नाव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 22, 2023 02:26 PM IST

ramiz raja says shubman gill is mini rohit sharma : शुभमन गिल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज आहे. अलीकडेच त्याने वनडेत द्विशतकही ठोकले आहे. रमीझ राजा यांनी शुभमनला मिनी रोहित शर्मा असे नाव दिले आहे.

Shubman Gill
Shubman Gill

भारताचा सलामीवीर शुभमन गिल वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. वनडेमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी ७०+ आहे. नुकतेच त्याने न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक झळकावले आहे. तर शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही त्याने ४० धावांची नाबाद खेळी खेळली. शुभमनच्या या धमाकेदार आणि नियमित कामगिरीबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनी कौतुक केले आहे. राजा यांनी शुभमन गिलला 'मिनी रोहित शर्मा' असे नाव दिले आहे.

भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वनडेनंतर रमीझ राजा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर शुभमनचे कौतुक केले आणि म्हटले, 'शुबमन गिल मिनी रोहित शर्मा आहे. त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. कालांतराने त्याच्यात आक्रमकताही येईल. त्याला स्वतःमध्ये काहीही बदलण्याची गरज नाही. नुकतेच त्याने द्विशतक झळकावले आहे".

शुभमनची फलंदाजी सरासरी अप्रतिम

शुभमन गिलने वनडे करिअरमध्ये आतापर्यंत २० सामने खेळले आहेत. यात त्याने ७१.३७ च्या फलंदाजीच्या सरासरीने ११४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही १०७.३३ असा राहिला आहे. आतापर्यंत आपल्या छोट्याशा कारकिर्दीत शुभमनने ३ शतके आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. सोबतच शुभमन एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १ हजार धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज बनला आहे.

रमीझ राजा यांनी यावेळी रोहित शर्माचेही कौतुक केले. ते म्हणाले, 'भारतासाठी फलंदाजी करणे सोपे होते कारण त्यांच्याकडे रोहित शर्मासारखा अप्रतिम सलामीवीर आहे. तो चांगला खेळतो. तो हुक आणि पूल शॉट्स खेळण्यात माहिर आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी १०९ धावांचे लक्ष्य सोपे झाले. रोहित शर्माने शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध १०९ धावांचा पाठलाग करताना ५० चेंडूत ५१ धावांची खेळी केली होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या