मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill : शुभमन गिल तिन्ही फॉरमॅटमधील शतकवीर, विराटचा ‘हा’ मोठा विक्रमदेखील मोडला

Shubman Gill : शुभमन गिल तिन्ही फॉरमॅटमधील शतकवीर, विराटचा ‘हा’ मोठा विक्रमदेखील मोडला

Feb 01, 2023, 09:10 PM IST

    • Shubman Gill - virat kohli : शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत तो पाचवा भारतीय ठरला. शुभमन गिलच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकली आहेत.
Shubman Gill virat kohli

Shubman Gill - virat kohli : शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत तो पाचवा भारतीय ठरला. शुभमन गिलच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकली आहेत.

    • Shubman Gill - virat kohli : शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत तो पाचवा भारतीय ठरला. शुभमन गिलच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकली आहेत.

Shubman Gill Century, ind vs nz 3rd t2: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना सुरू आहे. अहमदाबादेत हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि न्यूझीलंडसमोर २३५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक नाबाद १२६ धावा केल्या.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

गिलने ५४ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात नाबाद १२६ धावा केल्या. त्याच्या ६३ चेंडूंच्या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार मारले. शुभमनने ५४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तर त्याआधी त्याने ३५ चेंडूत आुपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतरच्या ५० धावा गिलने अवघ्या १९ चेंडूत ठोकल्या.

शुभमन गिलच्या या शतकाच्या बळावरच भारताने न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. गिलचे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनंतर आता T20 मध्येही शतक पूर्ण झाले आहे.

शुभमन तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा खेळाडू

या शतकानंतर शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत तो पाचवा भारतीय ठरला. शुभमन गिलच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकली आहेत.

टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक वैयक्तिक धावा

इतकंच नाही तर शुभमन गिल टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. शुभमन गिलने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीने ८ सप्टेंबर २०२२ रोजी अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद १२२ धावांची खेळी खेळली होती.

पुढील बातम्या