मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill : सचिन तेंडुलकर की विराट कोहली?; आदर्श कोण असं विचारताच शुभमन गिल काय म्हणाला पाहा!

Shubman Gill : सचिन तेंडुलकर की विराट कोहली?; आदर्श कोण असं विचारताच शुभमन गिल काय म्हणाला पाहा!

Jan 26, 2023, 10:00 AM IST

  • Shubman Gill likes Virat Kohli : क्रिकेटपटू म्हणून तुझा आदर्श कोण आहे या प्रश्नावर शुभमन गिलनं खूपच वेगळं उत्तर दिलं आहे.

Virat Kohli - Shubman Gill - Sachin Tendulkar

Shubman Gill likes Virat Kohli : क्रिकेटपटू म्हणून तुझा आदर्श कोण आहे या प्रश्नावर शुभमन गिलनं खूपच वेगळं उत्तर दिलं आहे.

  • Shubman Gill likes Virat Kohli : क्रिकेटपटू म्हणून तुझा आदर्श कोण आहे या प्रश्नावर शुभमन गिलनं खूपच वेगळं उत्तर दिलं आहे.

shubman gill picks virat kohli over sachin tendulkar : काही प्रश्न असे असतात की त्याची उत्तरं मनात तयार असली तरी ती जाहीरपणे द्यायला अनेकदा आवडत नाहीत किंवा अशा प्रश्नांना काही ठोस उत्तरच नसतं. त्यामुळं तसे प्रश्न आले की गोची होऊन जाते. प्रसिद्ध क्रीडापट्टू, कलाकार व अन्य मान्यवर व्यक्तींसोबत असं अनेकदा घडतं. असाच काहीसा प्रकार भारतीय संघाचा सध्याचा चर्चेतील फलंदाज शुभमन गिल याच्यासोबत घडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

शुभमन गिल यानं अलीकडंच एका मागोमाग एक शतक ठोकलं. एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा तो जगातील सर्वात तरुण फलंदाजही ठरला आहे. त्यामुळं त्यांच्याकडून भारतीय संघाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्याच्या मुलाखती सुरू आहेत. त्याला क्रिकेटशी संबंधित व वैयक्तिक आवडी-निवडींसंदर्भात प्रश्न विचारले जात आहेत. क्रिकेटमधील आदर्श कोण असा काहीसा अपेक्षित प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यासाठी देण्यात आलेले पर्याय अनपेक्षित होते. मात्र, शुभमन गिलनं हा प्रश्न बाउन्सर मानून सोडला नाही. त्यानं अत्यंत सहजपणे आणि प्रामाणिकपणे उत्तर दिलं.

‘क्रिकेटचा देव’ अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकर हा नव्या पिढीच्या अनेक क्रिकेटपटूंचा आवडता खेळाडू आहेच, शिवाय आदर्श आहे. शुभमन गिलचं मत यापेक्षा थोडं वेगळं आहे. या दोघांपैकी आदर्श म्हणून त्यानं विराट कोहलीची निवड केली आहे. त्याचं ठोस आणि पटण्यासारखं कारणही त्यानं दिलं आहे.

स्टार स्पोर्ट्स या क्रीडाविषयक वृत्तवाहिनीवर तो बोलत होता. ‘आदर्श म्हणून मी विराट भाईची निवड करेन. हे खरं आहे की सचिन सरांमुळंच मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, पण ते निवृत्त झाले तेव्हा मी खूप लहान होतो. क्रिकेट समजून घेण्याइतकी माझी समज नव्हती. विराट भाईकडून फलंदाजीच्या बाबतीत मी खूप काही शिकलो आहे. त्यामुळं माझ्यासाठी तेच आदर्श आहेत,’ असं शुभमन म्हणाला.