मराठी बातम्या  /  क्रीडा  /  क्रिकेटविश्वात ‘सूर्या’ची चमक; आयसीसीकडून ‘टी-२० क्रिकेटर ऑफ द ईयर’चा पुरस्कार जाहीर
Suryakumar Yadav
Suryakumar Yadav

क्रिकेटविश्वात ‘सूर्या’ची चमक; आयसीसीकडून ‘टी-२० क्रिकेटर ऑफ द ईयर’चा पुरस्कार जाहीर

25 January 2023, 18:28 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Suryakumar Yadav: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसी सध्या २०२२ या वर्षांचे आयसीसी पुरस्कार जाहीर करत आहे. याचदरम्यान, सूर्यकुमार यादवला टी-२० क्रिकेटर ऑफ द ईअर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ICC Men's T20I Cricketer Of The Year 2022: आयसीसीने बुधवारी टी-२० क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून भारतीय संघाचा तडाखेबाज सूर्यकुमार यादवची नावाची घोषणा केलीय. त्याने झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, इंग्लंडचा सॅम करन व पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान यांना मागे टाकत‌ या पुरस्कारावर आपले नाव कोरले. सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये १८७.४३ च्या स्ट्राईक रेटने १ हजार १६४ धावा केल्या.तसेच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचाही मान मिळवला.

ट्रेंडिंग न्यूज

टी-२० क्रिकेटमध्ये गेल्या वर्षी सूर्यकुमार यादवचा दबदबा पाहायला मिळाला. सूर्याने गेल्या वर्षी ३१ टी-२० सामन्यात ४६.५६ च्या सरासरीने १ हजार १६४ धावा केल्या. या खेळीदरम्यान, सूर्यकुमार यादवच्या बॅटीतून एकूण ६८ षटकार निघाले आहेत, जे टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात मारले गेलेले सर्वाधिक षटकार आहेत. या वर्षात सूर्याने ९ अर्धशतक आणि दोन शतक झळकावले आहेत.

सूर्याने २०२१ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सूर्याने सातत्याने चांगली कामगिरी बजावत त्याचे भारतीय संघातील स्थान निश्चित केले. त्याने भारताच्या अनेक विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलिया गेल्या वर्षी खेळण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकात सूर्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना ६ डावात ६० च्या सरासरीने धावा केल्या, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. या संपूर्ण स्पर्धेत सूर्याचा स्ट्राईक १८९.६८ इतका होता. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सूर्याचा भारतीय क्रिकेटमधील त्याचा दर्जा वाढला आहे. भारतीय निवड समितीने त्याला हार्दिक पांड्यासोबत टी-२० फॉरमॅटमध्ये उपकर्णधारपद दिले आहे.

विभाग