मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KL Rahul Athiya Wedding : राहुलपेक्षा जास्त शिकलीय अथिया! दोघांचं शिक्षण काय झालंय माहितीय का? पाहा

KL Rahul Athiya Wedding : राहुलपेक्षा जास्त शिकलीय अथिया! दोघांचं शिक्षण काय झालंय माहितीय का? पाहा

Jan 23, 2023, 07:22 PM IST

    • how educated KL Rahul & Athiya : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी आज (२३ जानेवारी) खंडाळ्यात सात फेरे घेतले.
KL Rahul Athiya Wedding

how educated KL Rahul & Athiya : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी आज (२३ जानेवारी) खंडाळ्यात सात फेरे घेतले.

    • how educated KL Rahul & Athiya : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी आज (२३ जानेवारी) खंडाळ्यात सात फेरे घेतले.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी मुंबईत अत्यंत साध्या पद्धतीने आज (२३ जानेवारी) सात फेरे घेतले. राहुल आणि अथियाच्या लग्नाला फक्त जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. मात्र, काही दिवसांनंतर भव्य स्वागत समारंभ होणार असून, त्यात सुमारे ३ हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

किती शिकलीय अथिया?

अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे. आपल्या मुलीला उत्तम शिक्षण देण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. अथियाने मुंबईतील प्रसिद्ध कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे येथे शिक्षण घेतले आहे.

अथिया फिल्ममेकिंग आणि लिबरल आर्ट्समध्ये पदवीधर आहे. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून चित्रपट निर्मितीचे धडे घेतले आहेत. २०१५ मध्ये, अथियाने निखिल अडवाणी दिग्दर्शित हिरो या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती.

केएल राहुल किती शिकलाय?

भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारा केएल राहुल त्याची पत्नी अथिया शेट्टीपेक्षा कमी शिकलेला आहे. लोकेश राहुलचे सुरुवातीचे शिक्षण NITK कॅम्पसमध्ये झाले. येथून त्याने इंग्रजी माध्यमातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने पुढील शिक्षण बंगळुरूच्या भगवान महावीर जैन कॉलेजमधून केले. येथून त्याने वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेतले.

राहुलचा अभ्यासाकडे फारसा कल नव्हता. वयाच्या १०व्या वर्षापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. २०१० साली झालेल्या ICC अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत त्याने टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये राहुलची चमकदार कामगिरी कायम राहिली. त्यानंतर २०१४ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१४ पासून तो भारतीय संघात कायम आहे.