मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KL Rahul Athiya Wedding: तीन दिवस चालणार केएल-अथियाचं लग्न, क्रिकेट-बॉलीवूडमधून ही मोजकीच लोकं येणार

KL Rahul Athiya Wedding: तीन दिवस चालणार केएल-अथियाचं लग्न, क्रिकेट-बॉलीवूडमधून ही मोजकीच लोकं येणार

Jan 12, 2023, 05:37 PM IST

    • KL Rahul Athiya Wedding: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू लोकेश राहुल याच महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. अथिया शेट्टी आणि लोकेश राहुलच्या लग्नाला फक्त निवडक पाहुणेच उपस्थित राहणार आहेत. या यादीत धोनी आणि कोहलीच्या नावाचाही समावेश आहे.
KL Rahul Athiya Wedding

KL Rahul Athiya Wedding: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू लोकेश राहुल याच महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. अथिया शेट्टी आणि लोकेश राहुलच्या लग्नाला फक्त निवडक पाहुणेच उपस्थित राहणार आहेत. या यादीत धोनी आणि कोहलीच्या नावाचाही समावेश आहे.

    • KL Rahul Athiya Wedding: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू लोकेश राहुल याच महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. अथिया शेट्टी आणि लोकेश राहुलच्या लग्नाला फक्त निवडक पाहुणेच उपस्थित राहणार आहेत. या यादीत धोनी आणि कोहलीच्या नावाचाही समावेश आहे.

भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. राहुल अनेक दिवसांपासून सुनिल शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीला डेट करत आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळातून जात आहे. त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. बॅटमधून धावा निघत नाहीत. पण आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला राहुल नवी इनिंग सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल अथिया शेट्टीसोबत यावर्षी २३ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहे.

हा विवाहसोहळा २१ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान चालणार आहे. पहिले दोन दिवस म्हणजे २१ आणि २२ जानेवारीला हळदी-मेहंदी आणि संगीत समारंभ आहे. तर २३ जानेवारी रोजी राहुल-अथिया सात फेरे घेणार आहेत. दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. हा सोहळ्याला मीडियापासून दूर ठेवण्यात येणार आहे.

या विवाह सोहळ्याला कोण-कोण हजेरी लावणार याची यादीही समोर आली आहे. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या बंगल्यावर हे लग्न होणार आहे. या लग्नाला फक्त निवडक पाहुणेच उपस्थित राहतील. पाहुण्यांच्या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनीचाही समावेश आहे. लग्नानंतर लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी वांद्रे येथे राहणार आहेत. अथिया-राहुलचे घर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घराजवळ असणार आहे.

बॉलीवूडमधून अमिताभ बच्चन, सलमान खान, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार यांसारख्या सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

 

पुढील बातम्या