मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KL Rahul Athiya Wedding : केएल राहुलच्या नव्या इनिंगला सुरुवात, खंडाळ्यात अथियासोबत 'शुभमंगल'!

KL Rahul Athiya Wedding : केएल राहुलच्या नव्या इनिंगला सुरुवात, खंडाळ्यात अथियासोबत 'शुभमंगल'!

Jan 23, 2023, 07:00 PM IST

    • KL Rahul-Athiya Shetty wedding : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी आज (२३ जानेवारी) खंडाळ्यात सात फेरे घेतले.
KL Rahul Athiya Wedding

KL Rahul-Athiya Shetty wedding : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी आज (२३ जानेवारी) खंडाळ्यात सात फेरे घेतले.

    • KL Rahul-Athiya Shetty wedding : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी आज (२३ जानेवारी) खंडाळ्यात सात फेरे घेतले.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी मुंबईत अत्यंत साध्या पद्धतीने सात फेरे घेतले. राहुल आणि अथियाच्या लग्नाला फक्त जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. मात्र, काही दिवसांनंतर भव्य स्वागत समारंभ होणार असून, त्यात सुमारे ३ हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका, मेंटॉर गौतम गंभीर आणि वेगवान गोलंदाज वरुण आरोन यांनी केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्याचबरोबर न्यूझीलंड मालिकेमुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारखे क्रिकेटपटू लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टी हनीमूनला जाणार नाहीत. वास्तविक, सध्या दोघांचे शेड्यूल खूपच पॅक आहे, अशा परिस्थितीत लग्नानंतर दोघेही आपापल्या कामात व्यस्त असतील.

 

दरम्यान, सुनील शेट्टी आणि अहान शेट्टी हे विवाहस्थळाबाहेर पापाराझींसाठी पोज देताना दिसले. यादरम्यान पिता-पुत्राची जोडी अप्रतिम दिसत होती. सुनील शेट्टी स्टील ग्रे कलरच्या शेरवानीमध्ये रूबाबदार दिसत होता, तर अहान शेट्टीने क्रीम कलरची शेरवानी परिधान केली होती.

पुढील बातम्या