मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asia Cup 2022 : आशिया कपसाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ जाहीर; असं आहे स्पर्धेचं वेळापत्रक

Asia Cup 2022 : आशिया कपसाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ जाहीर; असं आहे स्पर्धेचं वेळापत्रक

Aug 11, 2022, 02:17 PM IST

    • Asia Cup 2022 : येत्या २७ ऑगस्टपासून आशिया कपची यूएईत सुरुवात होणार आहे. ही स्पर्धी श्रीलंकेत होणार होती, परंतु श्रीलंकेतील सध्याची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाहता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाणार आहे.
Asia Cup 2022 Time Table And Schedule (HT)

Asia Cup 2022 : येत्या २७ ऑगस्टपासून आशिया कपची यूएईत सुरुवात होणार आहे. ही स्पर्धी श्रीलंकेत होणार होती, परंतु श्रीलंकेतील सध्याची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाहता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाणार आहे.

    • Asia Cup 2022 : येत्या २७ ऑगस्टपासून आशिया कपची यूएईत सुरुवात होणार आहे. ही स्पर्धी श्रीलंकेत होणार होती, परंतु श्रीलंकेतील सध्याची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाहता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाणार आहे.

Asia Cup 2022 Time Table And Schedule : येत्या २७ ऑगस्टपासून संयक्त अरब अमिरातीत होणाऱ्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय आणि पाकिस्तानी संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा याआधी श्रीलंकेत होणार होती, परंतु आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेऐवजी ही स्पर्धी यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळं आता २०१८ नंतर पुन्हा यूएईतच ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळं आशिया कप स्पर्धा झाली नव्हती. आता या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका हे संघ खेळणार आहेत. याशिवाय एक संघ क्वालिफायरच्या राऊंडमधून या स्पर्धेत आपली जागा पक्की करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

रिपोर्ट्सनुसार, आशिया कपसाठी सर्व देशांच्या संघाची घोषणा करण्यासाठी आठ ऑगस्टची मुदत देण्यात आली होती, परंतु भारत आणि पाकिस्तानशिवाय अजून कोणत्याही संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यात बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे.

आशिया कपसाठी असा आहे भारतीय संघ...

आशिया कपसाठी रोहित शर्माला कर्णधार करण्यात आलं आहे. याशिवाय लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि आवेश खान यांची निवड करण्यात आली आहे. तर दीपक चहर, अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांना अतिरिक्त खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

असा आहे पाकिस्तानचं संघ...

आशिया कपमध्ये बाबर आजमच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्ताचा संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय भारत आणि पाकिस्तानच्या संघांची घोषणा करण्यात आलेली असतानाही अजून बांग्लादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या संघांची आशिया कपसाठी निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळं आता आशिया कप ही स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना या संघांची घोषणा कधी होणार, याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.

असं आहे आशिया कपचं वेळापत्रक...

१. श्रीलंका वि. अफगाणिस्तान- २७ ऑगस्ट- दुबई

२. भारत वि. पाकिस्तान- ३० ऑगस्ट-दुबई

३. बांग्लादेश वि. अफगाणिस्तान- ३१ ऑगस्ट-शारजा

४. भारत वि. क्वालिफायर- ३१ ऑगस्ट- दुबई

५. श्रीलंका वि. बांग्लादेश- १ सप्टेंबर- दुबई

६. पाकिस्तान वि. क्वालिफायर- २ सप्टेंबर- शारजा

हे सामने संपल्यानंतर जे संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील त्यांच्यातल्या लढती होणार आहे. त्यानंतर ११ सप्टेंबरला आशिया कपची फायनल मॅच दुबईत खेळवली जाणार आहे.