मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Meg Lanning: जग जिंकून मेग लेनिंग ब्रेकवर! पाहा ऑस्ट्रेलियन कर्णधाराचं जबरदस्त करिअर

Meg Lanning: जग जिंकून मेग लेनिंग ब्रेकवर! पाहा ऑस्ट्रेलियन कर्णधाराचं जबरदस्त करिअर

Aug 10, 2022, 10:51 PM IST

    • Meg Lanning Takes Indefinite Break: मेग लेनिंगने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. २०१४ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी तिला कर्णधार बनवण्यात आले. तिने तिन्ही फॉरमॅटमध्ये १७१ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. यापैकी ऑस्ट्रेलियन संघाने १३५ सामने जिंकले आहेत. २०१७ पासून लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने केवळ ५ आंतरराष्ट्रीय सामने गमावले आहेत.
Meg Lanning

Meg Lanning Takes Indefinite Break: मेग लेनिंगने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. २०१४ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी तिला कर्णधार बनवण्यात आले. तिने तिन्ही फॉरमॅटमध्ये १७१ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. यापैकी ऑस्ट्रेलियन संघाने १३५ सामने जिंकले आहेत. २०१७ पासून लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने केवळ ५ आंतरराष्ट्रीय सामने गमावले आहेत.

    • Meg Lanning Takes Indefinite Break: मेग लेनिंगने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. २०१४ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी तिला कर्णधार बनवण्यात आले. तिने तिन्ही फॉरमॅटमध्ये १७१ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. यापैकी ऑस्ट्रेलियन संघाने १३५ सामने जिंकले आहेत. २०१७ पासून लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने केवळ ५ आंतरराष्ट्रीय सामने गमावले आहेत.

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऑस्ट्रेलियाला सुवर्णपदक मिळवून देणारी कर्णधार मेग लेनिंगने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे तिने वैयक्तिक कारणे दिली आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने अलीकडच्या काळात खूप यश मिळवले आहे. तिने कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी २०२० टी-20 वर्ल्ड कप आणि २०२२ वनडे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवले होते. कॉमनवेल्थ गेम्सच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.

या निर्णयानंतर मेग लॅनिंग कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही. यामध्ये 'द हंड्रेड'चाही समावेश आहे. द हंड्रेडच्या मागील मोसमात लेनिंग ट्रेंट रॉकेट्सकडून खेळली होती. ऑस्ट्रेलियाचा देशांतर्गत क्रिकेटचे सीझन सप्टेंबरमध्ये सुरू होते. त्याचबरोबर महिला बिग बॅश ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. लेनिंग या स्पर्धेत पुनरागमन करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ब्रेकवर जाण्याची घोषणा करताना लेनिंग म्हणाली की, “काही वर्षांच्या व्यस्ततेनंतर मी स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीए (Cricket Austrelia) आणि माझ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला आशा आहे की या काळात माझ्या गोपनीयतेचा आदर केला जाईल”.

मेग लेनिंगचे करिअर-

मेग लेनिंगने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. २०१४ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी तिला कर्णधार बनवण्यात आले. तिने तिन्ही फॉरमॅटमध्ये १७१ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. यापैकी ऑस्ट्रेलियन संघाने १३५ सामने जिंकले आहेत. २०१७ पासून लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने केवळ ५ आंतरराष्ट्रीय सामने गमावले आहेत.

लेनिंगने आतापर्यंत ६ कसोटीत ३१.३६ च्या सरासरीने ३४५ धावा केल्या आहेत. यामध्ये तिच्या नावावर २ अर्धशतके आहेत. त्याचवेळी वनडेमध्ये लेनिंगने ५३.१३ च्या सरासरीने ४,४६३ धावा केल्या आहेत. यामध्ये १५ शतके आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियासाठी १२४ T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिने ३६.४८ च्या सरासरीने ३,२११ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये तिच्या नावावर २ शतके आणि १५ अर्धशतके आहेत.

पुढील बातम्या