मराठी बातम्या  /  क्रीडा  /  UAE ILT20: ‘हे’ पाच देश UAE लीगमध्ये खेळणार नाहीत, क्रिकेट बोर्डांनी स्पष्टच सांगितलं

UAE ILT20: ‘हे’ पाच देश UAE लीगमध्ये खेळणार नाहीत, क्रिकेट बोर्डांनी स्पष्टच सांगितलं

Aug 10, 2022, 09:03 PM IST

    • UAE ILT20: या लीगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, कोलकाता नाईट रायडर्स, कॅप्री ग्लोबल, जीएमआर, लान्सर कॅपिटल आणि अदानी स्पोर्ट्सलाइन हे ६ फ्रँचायझी संघ खेळणार आहेत. ILT20 च्या २०२३ हंगामात ३४ सामने खेळवले जातील.
UAE ILT20

UAE ILT20: या लीगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, कोलकाता नाईट रायडर्स, कॅप्री ग्लोबल, जीएमआर, लान्सर कॅपिटल आणि अदानी स्पोर्ट्सलाइन हे ६ फ्रँचायझी संघ खेळणार आहेत. ILT20 च्या २०२३ हंगामात ३४ सामने खेळवले जातील.

    • UAE ILT20: या लीगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, कोलकाता नाईट रायडर्स, कॅप्री ग्लोबल, जीएमआर, लान्सर कॅपिटल आणि अदानी स्पोर्ट्सलाइन हे ६ फ्रँचायझी संघ खेळणार आहेत. ILT20 च्या २०२३ हंगामात ३४ सामने खेळवले जातील.

इंटरनॅशनल लीग T20 (ILT20 League) ही स्पर्धा पुढील वर्षी ६ जानेवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत ६ संघ फ्रेचायझी संघ सहभागी होणार आहेत. मात्र, या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ५ देशांच्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यास त्यांच्या क्रिकेट बोर्डांनी मनाई केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

अशा परिस्थितीत एमिरेट्स क्रिकेट बोर्ड आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत करार करण्यास धडपडत आहे. या लीगसोबत करार केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचा एकही खेळाडू नाही. बीसीसीआय आपल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळू देत नाही. दुसरीकडे पीसीबी आणि बीसीबीनेही परवानगी नाकारली आहे.

या लीगमध्ये ६ फ्रँचायझींचा समावेश

या लीगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, कोलकाता नाईट रायडर्स, कॅप्री ग्लोबल, जीएमआर, लान्सर कॅपिटल आणि अदानी स्पोर्ट्सलाइन हे ६ फ्रँचायझी संघ खेळणार आहेत. ILT20 च्या २०२३ हंगामात ३४ सामने खेळवले जातील. अंतिम फेरी आणि ४ प्लेऑफच्या आधी सर्व संघ एकमेकांशी दोनदा भिडतील. दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथे या स्पर्धेतील सामने होणार आहेत.

तसेच, गेल्याच आठवड्यात सहा ILT20 फ्रँचायझींनी खेळाडू आणि त्यांच्या एजंटशी खेळाडूंच्या कराराविषयी बोलणी सुरू केली आहे, अशी माहिती ILT20 चे अध्यक्ष खालिद अल जरूनी यांनी दिली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूही खेळणार नाहीत

भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट बोर्ड देखील त्यांच्या खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्यास मनाई करु शकतात. दरम्यान, ख्रिस लिन या ऑस्ट्रेलियन खेळाडूने या लीगसोबत करार केल्याची चर्चा आहे. मात्र,  लीगमध्ये सहभागी होण्याच्या लीनच्या मार्गात क्रिकेट ऑस्ट्रेलिया अडथळा ठरू शकतो. CA (क्रिकेट ऑस्ट्रेलिया) लिनला एनओसी देण्यास नकार देण्याची शक्यता आहे. तर कॉलिन इंग्राम दक्षिण आफ्रिकेकडून लीगमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

मात्र, दोन्ही क्रिकेट बोर्डाने परवानगी दिल्यानंतरच हे खेळाडू या लीगमध्ये खेळू शकतील.

पुढील बातम्या