मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kieron Pollard: रसेल-ब्राव्होच्या आधी पोलार्डने मारली बाजी, नावे केला मोठा विक्रम

Kieron Pollard: रसेल-ब्राव्होच्या आधी पोलार्डने मारली बाजी, नावे केला मोठा विक्रम

Aug 10, 2022, 09:28 PM IST

    • Kieron Pollard 600 matches: कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६०० सामने खेळणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
Kieron Pollard

Kieron Pollard 600 matches: कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६०० सामने खेळणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

    • Kieron Pollard 600 matches: कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६०० सामने खेळणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

वेस्ट इंडिजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ६०० T20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. द हंड्रेड लीगमध्ये लंडन स्पिरिटकडून खेळताना त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

 मँचेस्टर ओरिजिनल्सविरुद्धच्या या सामन्यात पोलार्डने ११ चेंडूत ३४ धावांची तुफानी खेळी खेळली. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आपला ६०० वा सामना खेळत पोलार्डने ४ षटकार आणि १ चौकार लगावला. 

पोलार्डची टी-20 कारकीर्द चांगली आहे. त्याने ६०० सामन्यांमध्ये ३१.३४ च्या सरासरीने ११ हजार ७२३ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावासंख्या १०४ इतकी आहे. पोलार्डने या फॉरमॅटमध्ये एक शतक आणि ५६ अर्धशतकं झळकावली आहेत. गोलंदाजीत त्याची सर्वोत्तम कामगिरी १५ धावांत ४  बळी ही आहे. तर त्याने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये ३०९ बळी घेतले आहेत. 

पोलार्डने अनेक T20 फ्ँचायझी संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेषत: वेस्ट इंडिजमधील टीम त्रिनिदाद आणि टोबॅगो, इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स, बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स, बांगलादेश प्रीमियर लीग  ढाका ग्लॅडिएटर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्ज, मुलतान सुलतान आणि पेशावर झल्मी या संघांसाठीही खेळला आहे.

किरॉन पोलार्डनंतर ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक T20 सामने खेळले आहेत. त्याने ५४३ सामने खेळले आहेत. तर पाकिस्तानी दिग्गज शोएब मलिकने आतापर्यंत ४७२ T20 सामने खेळले आहेत.

पुढील बातम्या