मराठी बातम्या  /  धर्म  /  Vijayadashmi 2022 : दसरा सण का साजरा केला जातो?, काय आहे दसऱ्याचा सण साजरा करण्यामागचं महत्व?

Vijayadashmi 2022 : दसरा सण का साजरा केला जातो?, काय आहे दसऱ्याचा सण साजरा करण्यामागचं महत्व?

Oct 04, 2022, 10:29 AM IST

  • What Is The Importance Of Celebrating Dussehra : शारदीय नवरात्रीच्या १० व्या दिवशी देशभरात दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून रामाची पूजा केली जाते असे मानले जाते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित पौराणिक श्रद्धा.

दसरा का साजरा केला जातो (हिंदुस्तान टाइम्स)

What Is The Importance Of Celebrating Dussehra : शारदीय नवरात्रीच्या १० व्या दिवशी देशभरात दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून रामाची पूजा केली जाते असे मानले जाते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित पौराणिक श्रद्धा.

  • What Is The Importance Of Celebrating Dussehra : शारदीय नवरात्रीच्या १० व्या दिवशी देशभरात दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून रामाची पूजा केली जाते असे मानले जाते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित पौराणिक श्रद्धा.

कैकेयी मातेच्या सांगण्यानुसार आणि आपले पिता दशरथ यांच्या आज्ञेनुसार राजा राम आपली भार्या सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह १४ वर्षांच्या वनवासाला निघाले. एका जंगलात त्यांनी आपली पर्णकुटी उभारली आणि तेथे ते आपल्या पत्नी आणि भावासह राहू लागले. कालांतराने रावणाने आपल्या कुटील डावाने माता सीतेचं अपहरण केलं आणि रामायणाच्या खऱ्या अध्यायाला सुरूवात झाली. त्यानंतर रामाने हनुमानाला सीतेच्या शोधार्थ पाठवलं. हनुमानाने रावणाच्या लंकेत सीता मातेला शोधण्यात यश मिळवलं. हनुमानाने रावणाला सीतामातेला प्रभू श्रीरामांकडे पुन्हा पाठवण्याची विनंती केली. रावणाने हनुमानजींची आज्ञा मोडून आपल्याच मृत्यूला आमंत्रण दिले. ज्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांनी रावणाचा वध केला तो शारदीय नवरात्रीचा दहावा दिवस होता.रामाने ९ दिवस दुर्गा देवीची पूजा केली आणि त्यानंतर १० व्या दिवशी रावणावर विजय मिळवला, म्हणून हा सण विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. श्रीरामाच्या सत्कर्मांनी रावणाच्या वाईट कृत्यांवर विजय मिळवला, म्हणून हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी रावणाचा मुलगा मेघनाद आणि त्याचा भाऊ कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचेही दहन केले जाते.

ट्रेंडिंग न्यूज

Mangalsutra : सौभाग्याचं प्रतीक मंगळसुत्र घालण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या

Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती, वाचा त्यांचा जीवन प्रवास

Lucky Plants for Home : कमी दिवसांमध्ये श्रीमंत व्हायचे असेल तर ही झाडं तुमच्या घरात नक्कीच लावा, जाणून घ्या

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला या गोष्टी लक्षात ठेवा, शनि जयंतीचं धार्मित महत्व काय? जाणून घ्या

महिषासुराचा वध माता दुर्गेने केला होता

पौराणिक मान्यतांनुसार विजयादशमी साजरी करण्यामागील आणखी एक समज अशी आहे की या दिवशी देवी दुर्गेने चंडीचे रूप धारण करून महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. महिषासुर आणि त्याच्या सैन्याने हैराण केल्यामुळे, देवी दुर्गेने महिषासुर आणि त्याच्या सैन्याशी सलग नऊ दिवस युद्ध केले.आणि १० व्या दिवशी महिषासुरचा अंत करण्यात त्याला यश आले. त्यामुळे शारदीय नवरात्रीनंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचेही विसर्जन केले जाते.

दसरा (विजयादशमी) अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच ही दशमी 'विजया दशमी' म्हणून ओळखली जाते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा