आयपीएल २०२४ चा ४७ वा सामना आज (२९ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात ९ गडी गमावून १५३ धावा केल्या. आता केकेआरला विजयासाठी १५४ धावा करायच्या आहेत.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचे सर्वच फलंदाज आज फ्लॉप ठरले. पॉवरप्लेमध्ये संघाने ३ गडी गमावले होते. पृथ्वी शॉ १३ धावा, मॅकगर्क १२ धावा करून आणि शाई होप ६ धावा करून बाद झाले.
यानंतर पुढच्याच षटकात दिल्लीने चौथी विकेटही गमावली. हर्षित राणाने अभिषेक पोरेलला ६८ धावांवर बाद केले. पोरेला १५ चेंडूत केवळ १८ धावा करता आल्या. यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी २५ धावांची भागीदारी केली जी वरुण चक्रवर्तीने मोडली. त्याने कर्णधार ऋषभ पंतला बाद केले. तो २० चेंडूत २७ धावा करून परतला.
यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ट्रिस्टन स्टब्स जास्त काळ विकेटवर टिकू शकला नाही. अवघ्या ४ धावा करून तो बाद झाला. या सामन्यात अक्षर पटेलने ३५, कुमार कुशाग्रने १ धाव, रसिक सलामने ८ धावा, कुलदीप यादवने ३५ धावा केल्या.
कुलदीप आणि लिझार्ड विल्यम्स नाबाद राहिले. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने ३ तर वैभव आणि हर्षीने प्रत्येकी २ बळी घेतले. तर मिचेल स्टार्क आणि सुनील नरेन यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद.
इम्पॅक्ट सब: मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रिकी भुई, सुमित कुमार, कुमार कुशाग्र.
कोलकाता नाईट रायडर्स: फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट सब: आंगकृष्ण रघुवंशी, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज.