मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Durga Puja Recipe: दुर्गापूजेला बनवा मसालेदार बैंगन भाजा! पारंपरिक बंगाली रेसिपी घ्या लक्षात

Durga Puja Recipe: दुर्गापूजेला बनवा मसालेदार बैंगन भाजा! पारंपरिक बंगाली रेसिपी घ्या लक्षात

Oct 04, 2022, 10:05 AM IST

    • Traditional Bengali Recipe: बंगाली लोक देवीसाठी खास पारंपारिक खाद्यपदार्थ बनवतात, त्यातील एक नाव बैंगन भाजा आहे.
बैंगन भाजा

Traditional Bengali Recipe: बंगाली लोक देवीसाठी खास पारंपारिक खाद्यपदार्थ बनवतात, त्यातील एक नाव बैंगन भाजा आहे.

    • Traditional Bengali Recipe: बंगाली लोक देवीसाठी खास पारंपारिक खाद्यपदार्थ बनवतात, त्यातील एक नाव बैंगन भाजा आहे.

Baingan Bhaja Recipe: माता दुर्गेचे हे नऊ दिवस देशभरात मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. पण बंगाली लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. दुर्गा पूजा हा बंगाली लोकांचा सर्वात मोठा सण दुर्गोत्सव म्हणूनही ओळखला जातो. दुर्गापूजेच्या वेळी आईला प्रसन्न करण्यासाठी विशेष भोग तयार केला जातो. बंगाली लोक या दिवशी त्यांचे पारंपारिक खाद्यपदार्थ बनवतात, त्यातील एक नाव बैंगन भाजा आहे. ही बंगाली डिश बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायलाही रुचकर आहे. ही मसालेदार आणि कुरकुरीत डिश बैंगन भाजा कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

बैंगन भाजा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

३ मोठी वांगी

१ टीस्पून आले-लसूण पेस्ट

२ टीस्पून लाल तिखट

१ टीस्पून हळद पावडर

१ टीस्पून धने पावडर

चवीनुसार मीठ

२ लिंबाचा रस

२ कांदे

हिरवी मिरची

१ आले

४ चमचे चिरलेली कोथिंबीर

१ कप मोहरी तेल

१ गरम मसाला

टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी

३ टोमॅटो

१ टीस्पून आले

१ टीस्पून हिरवी मिरची

२ टीस्पून चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार मीठ

१/२ टीस्पून साखर

१ चमचा लिंबाचा रस

२ चमचे मोहरीचे तेल

बैंगन भाजा बनवण्याची पद्धत

वांग्याचा भाजा करण्यासाठी प्रथम दोन वांगी नीट स्वच्छ करून अर्धा इंच जाड चकत्या कापून घ्या आणि त्यात आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला पावडर, मीठ आणि एका लिंबाचा रस मिसळा आणि बाजूला ठेवा. आता उरलेल एक वांग गँसवर ठेवा आणि छान भाजू द्या. वांग शिजल्यावर सोलून कापून घ्या. नंतर त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, मीठ आणि एका लिंबाचा रस घाला. आता एका पॅनमध्ये मोहरीचे तेल मंद आचेवर गरम करून त्यात दोन वांग्याचे मिश्रण तळून घ्या. नंतर त्या भाजलेल्या वांग्यासोबत सर्व्ह करू शकता.

टोमॅटोची चटणी

टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी प्रथम टोमॅटो पाण्यात टाका आणि उकळल्यानंतर मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्या आणि प्युरी तयार करा. आता ही प्युरी एका भांड्यात घेऊन त्यात चिरलेले आले, हिरवी मिरची, धणे, मीठ, एका लिंबाचा रस आणि मोहरीचे तेल घालून चांगले मिक्स करा. ही चटणी तुम्ही वांग्याच्या भाजा सोबत सर्व्ह करू शकता.

विभाग

पुढील बातम्या